जितेंद्र आव्हाड यांनी ठोकले मुंबई विद्यापीठाला ताळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 07:10 AM2017-08-08T07:10:40+5:302017-08-08T07:10:40+5:30
ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचे पूर्ण निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला ताळे ठोकले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचे पूर्ण निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला ताळे ठोकले. विद्यापीठाला ताळे ठोकल्यानंतर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिलेला शब्द आपण पाळला. वेळेत निकाल लावण्यात अपयशी ठरलेल्या विद्यापीठाला आपण ताळे ठोकले, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
मुंबई विद्यापीठातून पदवी परीक्षेसाठी बसलेले लाखो विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपूनही निकाल जाहीर करण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई विद्यापीठामुळे, राज्यभरातील विधि अभ्यासक्रम प्रक्रिया पुढे ढकलली होती, पण ९ ऑगस्टला विधि प्रवेशाची पहिली यादी लागणार असल्यामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत.
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे मुंबई विद्यापीठाचा निकाल रखडला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होणार नाही, याची कल्पना आल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ मागितली होती. तंत्रशिक्षण संचालनालायतर्फे ७ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ९ ऑगस्टला विधि अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर होणार आहे, तरीही मुंबई विद्यापीठाचे लाखो विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेतच आहेत.