...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:23 PM2023-11-07T18:23:32+5:302023-11-07T18:24:07+5:30

शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

Jitendra Awhad targeted Sunil Tatkare for his criticism of Supriya Sule | ...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

मुंबई - बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणब्यांविषयी वाईट लिहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या त्या लिखाणावर मी विरोध केला. परंतु त्यावेळी तुम्ही मला पक्षात असं अजिबात चालणार नाही, असा विरोध करून माझं वक्तव्य मागे घेण्यासाठी दम दिला होता. मीदेखील शुद्र आहे. हे नेहमी बोलतो कारण मला माझ्या शुद्र असण्याचा अभिमान आहे. पण आपण पाहिलं तर शुद्र म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे. जातीनिहाय जनगणनेसाठी शुद्र यांच्यासाठी आपल्याला उभे राहावे लागेल तुम्ही कधी न वापरलेले शस्त्र आता वापरायला नको होतं अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला.

सुनील तटकरेंनीसुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर देताना मी शुद्र असल्याचं म्हटलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे यांनी वक्तव्य करताना त्यांच्या आयुष्यात मागे वळून बघितलं असतं तर बरं झालं असतं कारण तुमच्या जीवनात तुम्हाला आत्तापर्यंत जी पद मिळाली आहे. ती चांगल्या घराण्यांना देखील मिळालेली नाहीत. शेकापचा विरोध असतानाही आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दामुळेच बनवलं गेलं अशी आठवण त्यांनी करून दिली.

त्याचसोबत तुम्हाला मंत्री पद, पुतण्या, मुलगा, भाऊ या सगळ्यांना आमदारकी आणि त्यानंतर तुम्हाला खासदारकी दिली. मला न देता तुमच्या मुलीला रायगडचं पालकमंत्री पद देखील दिलं. इतकं होऊनही तुमचं हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाण्यासाठी सुनील तटकरे यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडली. शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं असा दावाही आव्हाडांनी केला आहे.

दरम्यान, खरा अर्थाने कोणाला आरक्षणाची गरज आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. वंचित समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीचे साधन नाही. हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. गावच्या सीमे बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण होतं. कारण आरक्षणाच्या माध्यमातून त्या लोकांना बाबासाहेबांनी माणसात आणलं. आज जगातील प्रत्येक राष्ट्रात आरक्षण आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालंच पाहिजे. जाती जातीत भांडणं लावणं योग्य नाही. आपल्या महाराष्ट्रात ३२९ जाती आहेत. सर्व जाती आपल्याला माहिती नाही. भामटा राजपूत नावाची जात देखील महाराष्ट्रात आहे आणि ती किती जणांना माहिती असेल? खरंच कुणबी नोंद असेल तर ते त्यांना मिळालंच पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

Web Title: Jitendra Awhad targeted Sunil Tatkare for his criticism of Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.