Maharashtra Election 2019: जितेंद्र आव्हाडांना 'रम्या'ने सुनावले; म्हणाला 'तुमच्या बेसिकमध्येच लोच्या'!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:40 PM2019-10-05T15:40:30+5:302019-10-05T15:49:45+5:30
जितेंद्र आव्हाड 3 ऑक्टोबरला अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी मिरवणुकीतून निघाले होते. यावेळी राष्ट्रीय स्तरावर गाजलेला नेता कन्हैय्या कुमारही होता. #MaharashtraElection2019
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने नोंदविलेल्या गुन्ह्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे वातावरण ढवळून निघाले आहे. यातच मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून भाजपाला वारंवार सोशल मिडीयावर टोमणे ऐकावे लागतात. याचा वचपाच भाजपाच्या 'रम्या' नावाच्या कार्टूनमधील पात्राने काढला आहे.
झाले असे की जितेंद्र आव्हाड 3 ऑक्टोबरला अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी मिरवणुकीतून निघाले होते. यावेळी राष्ट्रीय स्तरावर गाजलेला नेता कन्हैय्या कुमारही होता. मात्र, आव्हाड यांना या दिवशी अर्ज भरायला उशिर झाला. यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी पुन्हा जावे लागले. यावरून रम्याने आव्हाडांची खिल्ली उडविली आहे.
आव्हाड यांनी एकदा गीतेतील यदा यदा ही धर्मस्य हा श्लोक म्हटला होता. यावेळी त्यांनी उच्चार चुकीचा केला होता. या चुकीवर रम्याने बोट ठेवत आव्हाडांच्या बेसिकमध्येच लोच्या असल्याचे म्हटले आहे.
भाग पहिला, डोस 16 व्या व्यंगचित्रामध्ये रम्याला त्याचा मित्र विचारतो की, आव्हाड साहेब एवढा गाजावाजा करत अर्ज भरायला गेले पण वेळ संपल्याने माघारी परतले. त्यांच्याबरोबर मोठे साहेब आणि कन्हैय्या देखील होते. यावर रम्याने उत्तर देत आव्हाडांची खिल्ली उडविली आहे. रम्या म्हणतो, चिन्ह घड्याळ असलं तरी सोबत कन्हैय्या नाव असेलेली व्यक्ती असली की यांना वाटतं, काळ यांच्यासोबत आहे. पण शेवटी काळाच्या मनात जे आहे तेच होणार. पण यांच्या बेसिकमध्येच लोच्या आहे ना...'यदा यदासी धर्मस्य'.
रम्या म्हणतो, कन्हैय्याला सोबत घेऊन फिरले म्हणून काळ आपला होत नाही... तसेच गीतेतल्या श्लोकाचे उच्चर स्पष्ट होतात असं ही नाही!#रम्याचेडोस@Awhadspeaks@NCPspeakspic.twitter.com/WoWw8CxFSX
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 5, 2019
भाजपा महाराष्ट्रने ट्विटरवर हे कार्टून पोस्ट केले आहे. मात्र, त्यांच्याही ट्विटमधील उच्चार हा शब्द चुकला आहे.