मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर...; जितेंद्र आव्हाडांनी विचारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 06:43 PM2022-11-25T18:43:15+5:302022-11-25T18:43:38+5:30
तुम्ही फेरचौकशी करा नाहीतर काहीही करा. राज्य सरकारनं उच्च न्यायालयात म्हणणं मांडलं होते. आता सर्वोच्च न्यायालयात त्यांचे म्हणणं बदलावं लागेल. आता ते काय करतात हे पाहावं लागेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ठाणे - मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर महाराष्ट्रात काय रिएक्शन येईल. मी तर मुख्यमंत्र्यांहून छोटा कार्यकर्ता आहे. मलाही मानणारे ४ लोक आहेत. तुमचा असा फोटो टाकला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. मी माणूस नाही का? त्यामुळे एखादी बाजू मांडताना बाकीच्या बाजूही विचारात घ्यायच्या असतात असा टोला माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्याचसोबत राज्य सरकार आपल्याविरोधात असेल तर आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे जेव्हा मानसिकदृष्ट्या तयारी असते तेव्हा जेलचे दरवाजे आणि लोखंडी सळ्या काय वाटत नाही. मी खून, बलात्कार केला नाही असं आव्हाडांनी म्हटलं.
जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसेंना केलेल्या मारहाण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत राज्य सरकारला त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी सांगितले होते. तेव्हा राज्य सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी द्या किंवा सीबीआय द्या आमचं काही म्हणणं नाही सांगितले. त्यावर न्यायाधीशही हसले असं आव्हाडांनी माहिती दिली. सुनावणीबाबत आव्हाड म्हणाले की, हा गुन्हा घडून पावणे तीन वर्ष झाली. चार्जशीट कोर्टात दाखल झालीय. सरकारने उच्च न्यायालयात शपथपत्रावर लिहून दिलंय. निकाल जाहीर झाला आहे. जो तपास झाला तो चुकीचा होता, त्यात त्रुटी राहिल्यात असं काहीतरी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात सांगावं लागेल. सरकार बदलतात पण पोलीस बदलत नाही. पोलिसांनी खोटं काम केले असं जर सर्वोच्च न्यायालयात असं म्हटलं गेले तर त्याचे दूरगामी परिणाम मला अडकवण्यासाठी होतंय असं होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच सुप्रीम कोर्टात वकिलांनी ७२ तासांच्या गुन्ह्याचाही उल्लेख केला. जितेंद्र आव्हाड गुंड आहे तर होय, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सिनेमा बंद करणारा गुंड आहे. शिवाजी महाराजांसाठी गुंडगिरी मला चालेल. इतिहासाची विकृतीकरण होऊ देणार नाही. जो करेल त्याला भोगावं लागेल असं त्यांनी सांगितले. राज्य सरकारचं म्हणणं हास्यास्पद होते. स्वत: न्यायाधीशही हसले. हे राज्य सरकार कसं मागे लागले. कोण मागे आहे ते अख्खं ठाण्याला, महाराष्ट्राला माहिती आहे. मला इतकं गांभीर्याने घेतलंय त्याचे कौतुक वाटते. काही होईल. १ महिना जेलमध्ये राहावं लागेल असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, तुम्ही फेरचौकशी करा नाहीतर काहीही करा. राज्य सरकारनं उच्च न्यायालयात म्हणणं मांडलं होते. आता सर्वोच्च न्यायालयात त्यांचे म्हणणं बदलावं लागेल. आता ते काय करतात हे पाहावं लागेल. एखादा माणूस ४ वर्ष माझा पाठलाग करतात. माझे नागडे फोटो टाकतो. उच्च न्यायालय स्वत: म्हणतं हा माणूस खोटारडा आहे. याने अनेक गोष्टी लपवून ठेवल्यात असं निरीक्षण अनंत करमुसेबद्दल न्यायाधीशांनी मांडले आहे. करमुसेने पहिला एफआयआर दिला तो सगळ्यांसमोर आहे. त्याच्यानंतर त्याला कोण कोण काय काय बोलले मला सगळं माहिती आहे. १० दिवसांनी स्टेटमेंट बदलतो तो विचार करून केलेला असतो. हायकोर्टानं करमुसेचे म्हणणं खोटे असल्याचं म्हटलंय. तो कुणाच्या बंगल्यावर जातो. बैठकीला हे माहिती आहे असं सांगत आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"