जीवात्मा, परमात्म्याचे मिलन म्हणजे योग
By Admin | Published: June 27, 2016 01:46 AM2016-06-27T01:46:23+5:302016-06-27T01:46:23+5:30
जीवात्मा आणि परत्माता यांचे मिलन म्हणजे योग, ही शिव आणि कृष्णाने केलेली व्याख्या उचित आहे.
मुंबई : जीवात्मा आणि परत्माता यांचे मिलन म्हणजे योग, ही शिव आणि कृष्णाने केलेली व्याख्या उचित आहे. पाण्यात साखर मिसळल्यावर एकरूप होते. दोघांचे अस्तित्व वेगळे राहत नाही. त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधनेने जीवात्मा आणि परत्मामा एक होतात आणि द्वैताची जाणीव राहात नाही. हीच योगाची खरी व्याख्या आहे, असे दादा देवात्मानंद यांनी स्पष्ट केले.
जागतिक योग दिनानिमित्त साधना पद्धतीवर आधारित दोन दिवसांच्या योग शिबिराचा समारोप झाला. या शिबिराचे आयोजन आचार्य शुभप्रसन्नानंद अवधूत, डॉ योगेंद्र पाठक, डॉ. नागेश सांडू, श्री. बसंत सारंगी यांनी केले.
नेरूळ येथील सेक्टर ६मधील लोकमान्य टिळक सभागृहात हे शिबिर झाले. आसन केल्याने ग्रंथी दोष, चिंता, शारीरिक व्याधी दूर होतात. आसन साधनेस मदत करते. आसन दोन प्रकारची असतात. स्वास्थ्यासन आणि ध्यानासन. स्वास्थ्यासन शरीरासाठी तर ध्यानासन मन केंद्रित करण्यासाठी मदत करतात. प्राणायाम केल्याने श्वास नियंत्रित केला जातो. अष्टांग योग साधनेतील यम-नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हेदेखील मनुष्यासाठी उपयुक्त ठरतात, असा सूर या वेळी व्यक्त झाला. (प्रतिनिधी)