जे.जे. रुग्णालयातही आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

By admin | Published: November 10, 2014 04:28 AM2014-11-10T04:28:25+5:302014-11-10T04:28:25+5:30

महापालिकेच्या केईएम रुग्णालयापाठोपाठ भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात देखील डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी पाच ठिकाणे आढळून आली आहेत

J.J. Dengue larvae found in the hospital | जे.जे. रुग्णालयातही आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

जे.जे. रुग्णालयातही आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

Next

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयापाठोपाठ भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात देखील डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी पाच ठिकाणे आढळून आली आहेत. रुग्णालयाच्या ज्या भागामध्ये अळ््या आढळून आल्या आहे, तिथल्या संबंधित व्यक्तींना कीटकनाशक विभागाने शुक्रवारी नोटीस पाठविल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात वाढतात. जे. जे. रुग्णालयाचा परिसर मोठा असल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचून राहते. यामुळेच या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होते, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. सप्टेंबरमध्ये जे. जे. रुग्णालयातील कर्मचारी वसाहतींमध्ये २ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे आढळले होते. आता आणखी तीन ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याचे आढळून आले आहे. तसेच सरकारी रक्तपेढीच्या बाजूलाही पैदास होत असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, जे.जे. रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. आम्ही रुग्णालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवित आहोत, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. मात्र जे.जे. रुग्णालय परिसरामध्ये दर शनिवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते. तरीही रुग्णालय परिसरामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना डेंग्यू, मलेरियाची लागण झाली आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांना, त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. निवासी डॉक्टरांनाही डेंग्यू आणि मलेरियाची लागण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: J.J. Dengue larvae found in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.