एसटी महामंडळात होणार जम्बो भरती

By admin | Published: September 20, 2016 05:02 AM2016-09-20T05:02:51+5:302016-09-20T05:02:51+5:30

एसटी महामंडळात येत्या काही महिन्यांत जम्बो भरती केली जाण्याची शक्यता आहे

Jmbo recruitment in ST corporation | एसटी महामंडळात होणार जम्बो भरती

एसटी महामंडळात होणार जम्बो भरती

Next


मुंबई : एसटी महामंडळात येत्या काही महिन्यांत जम्बो भरती केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत महामंडळात रिक्त जागा भरल्या न गेल्याने तब्बल १५ हजार जागा रिक्त आहेत. यात चालक-वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. या जागा भरण्यासाठी एसटी महामंडळाने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीशीही बोलणी सुरू केली आहे.
२0१४ मध्ये एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. त्यानंतर महामंडळात भरती प्रक्रिया झाली नाही. दोन वर्षांत एकही जागा भरली न गेल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झाल्या. एसटी महामंडळासाठी वर्ग-१ ते वर्ग-४ साठी १ लाख २६ हजार ११५ जागा मंजूर असून यात १ लाख ४ हजार ३९८ मनुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता सुमारे २२ हजार जागाच रिक्त असून यामध्ये ६ हजार ९0२ ही बढतीतील पदे तर १५ हजार १२२ सरळ सेवेतील परीक्षा घेऊन भरण्यात येणारी पदे समाविष्ट आहेत. बढती प्रक्रियेतील पदे भरण्याचे काम एसटी महामंडळाकडून सुरू आहे. सरळ सेवेत असणाऱ्या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागीर, साहाय्यक कारागीर यांची पदे मोठी असल्याचे महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या ३६ हजार ७३२ चालक असून आणखी २ हजार ९७७ चालकांची गरज आहे. तर ३४ हजार ८0७ वाहक कार्यरत असून आणखी ३ हजार ९६३ वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागीर, साहाय्यक कारागीर यांचीही ५ हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-४ मधील अन्य काही पदेही रिक्त आहेत. कंपनीला भरती प्रक्रियेचे काम दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
>अधिकारी वर्ग १ आणि २ चीही ९३३ पदे मंजूर आहेत. यात प्रत्यक्षात ५५२ पदे भरलेली असून ३८१ रिक्त जागा आहेत. रिक्त जागा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे.
>कंपनी नियुक्त करणार : भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्यात करायची की नाही, याबाबतचा निर्णय सर्वतोपरी एसटी महामंडळाकडून घेतला जाणार आहे. त्याआधी भरती प्रक्रिया राबवणाऱ्या कंपनीचीही नियुक्ती केली जाईल.
>महत्त्वाची रिक्त पदे
पदेमंजूरकार्यरतरिक्त
चालक३८,८२५३६,७३२२,९७७
वाहक३७,९१0३४,८0७३,९६३
कारागीर७,६९९४,४६२३,२0२
सहा.कारागीर६,९८५४,७३४२,२१३

Web Title: Jmbo recruitment in ST corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.