JNU प्रकरण - पीडीपीबरोबर सत्ता स्थापणा-या भाजपानं देशभक्तीची प्रमाणपत्र वाटू नये - राज ठाकरे

By admin | Published: February 27, 2016 12:46 PM2016-02-27T12:46:56+5:302016-02-27T12:54:46+5:30

जेएनएयू प्रकरणात भाजपा राजकारण आणत आहे, देशभक्तीची प्रमाणपत्रं भाजपानं वाटू नये असं सांगत, अफझल गुरूसंदर्भात ठराव मांडणा-या पीडीपीसोबत भाजपानं सरकार स्थापन केलं आहे

JNU Case - BJP's establishment with PDP should not be considered a patriot certificate - Raj Thackeray | JNU प्रकरण - पीडीपीबरोबर सत्ता स्थापणा-या भाजपानं देशभक्तीची प्रमाणपत्र वाटू नये - राज ठाकरे

JNU प्रकरण - पीडीपीबरोबर सत्ता स्थापणा-या भाजपानं देशभक्तीची प्रमाणपत्र वाटू नये - राज ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - जेएनएयू प्रकरणात भाजपा राजकारण आणत आहे, देशभक्तीची प्रमाणपत्रं भाजपानं वाटू नये असं सांगत, अफझल गुरूसंदर्भात ठराव मांडणा-या पीडीपीसोबत भाजपानं सरकार स्थापन केलं आहे याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली आहे. देशविरोधी घोषणा कोणी देत असेल तर त्याला तिथं जागच्या जागी फोडायला हवं असं राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अभाविपला जेएनयूमध्ये स्थिरस्थावर करण्यासाठी हे केलं जातंय का असं वाटावं अशी स्थिती असल्याचं राज ठाकरे म्हणाले. अशा मुद्यांमध्ये राजकारण आणू नये आणि जे कोणी देशविरोधी घोषणा देतील त्यांना तिथल्या तिथं फोडावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
टोल, रेल्वेतल्या नोक-या इथपासून ते नरेंद्र मोदींच्या सरकारचं काम इथपर्यंत राज यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- भारतविरोधी घोषणा देणा-यांचा भाजपाला तिटकारा वाटतो मग हाच विचार काश्मीरमध्ये पीडीपीशी युती करताना का आला नाही?
- भारताविरोधात कोणी घोषणा देत असतील तर तिथल्या तिथे फोडून काढा, शिक्षा करा पण त्यावरून कोणीही राजकारण करू नये.
- २००८ नंतर (मनसेच्या आंदोलनानंतर) मराठी चित्रपटांचा ट्रेंड बदलला.
- बाजीराव मावळ्यांसह नाचतात हे पाहिल्यानंतरच माझा त्यातील (चित्रपटातील) रस संपला. इतिहास लोकांसमोर आणताना तो योग्य पद्धतीनेच मांडला गेला पाहिजे, असं मला वाटतं.
- आपण केलेले लिखाण वा कामाला लोकांनी दिलेली पावती, त्यांचं प्रेम हाच सगळ्यात मोठा पुरस्कार असतो असं मला वाटतं.
- टोल घेणे हे सरकारचे काम आहे, मग खासगी कंपन्यांना का दिला जातो?
- टोल बंद करण्याचे श्रेय मनसेला जातं.
- मोदींनी झटक्यात भ्रमनिरास केला, ते उद्योग गुजरातकडे वळवत आहेत.
- मराठीसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज.
- मराठी ही इंग्रजीसारखी सर्वसमावेशक हवी, नवे शब्द सामील करून घ्यायला हवे.
- साहित्य संमेलनातून निष्पन्न काय होते, तरूणांना काय मिळते, याचा विचार करणे आवश्यक आहे.
- आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, दळवी हे माझे आवडते लेखक.
- माणसाला छंद असतील तर त्याल जय-पराजयाची भीती वाटत नाही.
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तकाचे काम सुरू.
- व्यंगचित्रकार काढताना राज ठाकरे असं नाव लिहीत जा ही सूचना बाळासाहेबांनी केली होती.
- माझं पहिलं प्रेम सिनेमा.
- मनसेच्या पाठपुरव्यामुळेच १४०० मुलं मध्य रेल्वेतील नोकरीत कायम झाली.
- मराठी भाषा दिन फक्त एकच दिवस नको ३६५ दिवस हवा.
- आमच्या आंदोलनानंतर रेल्वेच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात येऊ लागल्या.
- मराठी भाषेसाठी लढतच राहणार.

Web Title: JNU Case - BJP's establishment with PDP should not be considered a patriot certificate - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.