नोकरीच्या आमिषाने तरुणांना पन्नास लाखांचा गंडा
By admin | Published: October 14, 2016 04:35 PM2016-10-14T16:35:51+5:302016-10-14T16:35:51+5:30
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी काही युवकांना सुमारे पन्नास लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
क-हाड, दि. १४ - राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी काही युवकांना सुमारे पन्नास लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी क-हाड शहर पोलिसात चार युवकांनी तक्रार दिली असून प्रथमदर्शनी चौदा लाखाची फसवणूक निष्पन्न झाली आहे.
क-हाडप्रमाणेच सातारा, पुणे, कोरेगाव, मुंबई याठिकाणीही आपण युवकांकडून पैसे घेतल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे फसवणुकीतील रक्कमेचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.
अनिल बाबुराव देवकर (रा. किरपे, ता. क-हाड) व सुरेश मोतीलाल पल्लोर (रा. रामकुंड, सदरबझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांनाही क-हाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बँक ऑफ इंडीयामधील नियुक्तीची बनावट कागदपत्रही हस्तगत करण्यात आली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड तपास करीत आहेत.