नोकरीच्या प्रलोभनाने २० लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2016 03:57 AM2016-07-23T03:57:30+5:302016-07-23T03:57:30+5:30

शिक्षण विभागात लिपिकपदावर नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून एका भामट्याने सहा जणांना २० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे

Job temptation cost 20 lakhs | नोकरीच्या प्रलोभनाने २० लाखांना गंडा

नोकरीच्या प्रलोभनाने २० लाखांना गंडा

Next


कल्याण : समाजकल्याणअंतर्गत शिक्षण विभागात लिपिकपदावर नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून एका भामट्याने सहा जणांना २० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये दोन डॉक्टरही आहेत.
डॉ. भूषण कुलकर्णी यांना सप्टेंबर २०१४ पासून प्रवीण सूर्यवंशी (३०, रा. कृष्ण विहार सोसायटी, पळस्पे, पनवेल) याने समाजकल्याणअंतर्गत शिक्षण विभागात नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवले. त्यांच्यासोबत कुलकर्णी यांचे नातेवाईक विजय कुलकर्णी, योगेश जोशी, भूषण चंद्रात्रे, डॉ. प्रकाश वाघ व रामा राऊत यांचीही फसवणूक सूर्यवंशी याने केली आहे. त्याने त्यांच्याकडून प्रत्येकी चार लाख असे एकूण २० लाख घेतले. मात्र, एकालाही नोकरी लावली नाही की, पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याने त्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Job temptation cost 20 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.