जोधपूर-बंगळुरू एक्स्पे्रेसमधून ११ लाखांचा ऐवज लंपास

By admin | Published: June 16, 2017 12:45 AM2017-06-16T00:45:13+5:302017-06-16T00:45:13+5:30

जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी ८ प्रवाशांचा तब्बल ११ लाखांचा ऐवज लंपास केला. या चोरीबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

The Jodhpur-Bangalore Express has 11 lakh lapses | जोधपूर-बंगळुरू एक्स्पे्रेसमधून ११ लाखांचा ऐवज लंपास

जोधपूर-बंगळुरू एक्स्पे्रेसमधून ११ लाखांचा ऐवज लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज (जि. सांगली) : जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी ८ प्रवाशांचा तब्बल ११ लाखांचा ऐवज लंपास केला. या चोरीबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी पहाटे मिरजेकडे येणाऱ्या जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेसमध्ये एस-चार, पाच, सहा व आठ या आरक्षित बोगीत झोपलेल्या प्रवाशांच्या पर्स व बॅगा चोरट्यांनी चोरून नेल्या. लोणावळा ते पुणेदरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. पुणे स्थानक सोडल्यानंतर बॅगा चोरीला गेल्याचे लक्षात आले, तेव्हा गोंधळ उडाला.

Web Title: The Jodhpur-Bangalore Express has 11 lakh lapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.