जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, लोकमतचा रविवारी हेल्दी बेबी कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 03:40 AM2016-08-25T03:40:38+5:302016-08-25T03:40:38+5:30

हेल्दी बेबी कॅम्प ही जागृती करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत एक भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे.

Johnson & Johnson, Lokmat Sunday Healthy Baby Camp | जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, लोकमतचा रविवारी हेल्दी बेबी कॅम्प

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, लोकमतचा रविवारी हेल्दी बेबी कॅम्प

Next


ठाणे : हेल्दी बेबी कॅम्प ही जागृती करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत एक भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे. सुदृढ, निरोगी बाळ हे प्रत्येक मातापित्याचे स्वप्न असते. चांगली व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशी टप्प्याटप्प्याने विकसित होणारी आपली संस्कृती आणि त्यात घडवणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या भारतातील सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅण्ड आणि आपली सामाजिक बांधीलकी जपतजपत क्रांती घडवणारे वृत्तपत्र म्हणजे लोकमत यांनी या दृष्टीने हे पाऊल उचलून एक वेगळी संकल्पना ठेवली आहे. १०० हून अधिक वर्षांसाठी जॉन्सन बेबी हे बाळाच्या शुश्रूषाविज्ञानामध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे, ज्यातून पिढी-दरपिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्याचा अतूट विश्वास आणि म्हणूनच जॉन्सनचे उत्पादन आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आले असून जगभरातील हजारो मतांद्वारे खऱ्या अर्थाने घरांमध्ये चाचणी केली जाते, ज्यावर असतो मातेचा संपूर्ण विश्वास. ज्या विश्वासावर तर बाळ घडत जातं. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन आणि लोकमत वृतपत्रसमूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. अशा प्रकारचे आयोजन सातत्याने केले जाते. मागील वर्षी पण अशा पद्धतीचे कार्यक्रम संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रात राबवले गेले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून हेल्थ जागृती वाढवून येणाऱ्या पिढीला संजीवनी देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमामार्फत होणार आहे, हे निश्चित. तेव्हा, या कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी यानिमित्ताने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा समस्त पालकांनी घ्यावा आणि या कॅम्पला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आयएपी इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स ही भारतातील बालरोगचिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, जी आरोग्याच्या सुधारणेसाठी आणि बाळांच्या हितासाठी सतत झटत असते.
रविवार, २८ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत कांती विसारिया हॉल, आर्य क्रीडा मंडळ बिल्डिंग, गावदेवी मंदिराजवळ, डॉ. बेडेकर हॉस्पिटलसमोर, महर्षी कर्वे रोड, ठाणे (प.) येथे आयोजित हेल्थ कॅम्पमध्ये ० ते ५ वयोगटांतील बाळाच्या आरोग्याची तपासणी तसेच पालनपोषणाविषयी पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. बाळाच्या उज्ज्वल निरोगी भविष्यासाठी राबवल्या जाणाऱ्या शिबिराचे उद्घाटन आयएपी ठाणे अध्यक्ष डॉ. राम गुंडाळे, सचिव डॉ. प्रशांत दरंदले यांच्या हस्ते होणार आहे. यात प्रतिकारशक्ती आणि लसीकरण या विषयावर डॉ. सुदेशा बोंदे्र, पालकत्व या विषयावर डॉ. सायली खंडपूर, संतुलित आहाराविषयी डॉ. पारूल शुक्ला मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला आयएपी, ठाणे यांचे सहकार्य लाभले आहे. हे शिबीर विनामूल्य असून जास्तीतजास्त संख्येने पालकांनी या आरोग्य तपासणी शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमतने केले आहे.

Web Title: Johnson & Johnson, Lokmat Sunday Healthy Baby Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.