महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करणार - डी. के. शिवकुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:03 AM2019-05-07T07:03:14+5:302019-05-07T07:03:28+5:30

कृष्णा नदीकाठावरील प्रदेशात दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करण्यास कर्नाटक सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Joint Communications with Maharashtra - D. Of Shivkumar | महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करणार - डी. के. शिवकुमार

महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करणार - डी. के. शिवकुमार

googlenewsNext

बेळगाव : कृष्णा नदीकाठावरील प्रदेशात दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करण्यास कर्नाटक सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र शासनाने कृष्णा नदीत कोयना धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात कर्नाटक पाणी महामंडळांच्या मुख्य अभियंता कार्यालयात सोमवारी बैठक झाली. यावेळी बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील आमदार व खासदार उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, दरवर्षी चार टीएमसी पाण्याच्या वापरासंदर्भात महाराष्ट्र सरकारने आपल्या कराराचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला आहे. उभय राज्यांच्या कृष्णाकाठ भागातील लोकांची पाण्याची समस्या कायमची संपुष्टात यावी, यासाठी कर्नाटक करार करण्यास सहमत आहे.
हिवाळा व पावसाळ्यात प्रत्येकी दोन टीएमसी पाणी आम्हाला मिळवून दिल्यास उन्हाळ्यात पेयजल समस्याचे निवारण करण्यास कृष्णा नदीमध्ये चार टीएमसी पाणी सोडण्याबाबत प्रस्तावात म्हटले आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकार पैसे घेऊन पाणी पुरवत होते. २००४ ते २०१७ पर्यंत अनेकवेळा अशाप्रमाणे पाणी मिळवले आहे. यावेळी मात्र पाणी वापर प्रस्ताव आम्ही सादर केला आहे. कर्नाटक सरकारसुध्दा सकारात्मक निर्णय घेईल, असे शिवकुमार म्हणाले.

कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी

कृष्णा नदी काठावरील बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्याच्या विविध भागात पाणी समस्या बिकट आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने ताबडतोब कोयना धरणातून चार टीएमसी पाणी कृष्णेत सोडावे, अशी विनंती शिवकुमार यांनी केली आहे. तरीही महाराष्ट्राने पाणी सोडलेले नाही.

Web Title: Joint Communications with Maharashtra - D. Of Shivkumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.