भाईंदरमधील जोशी रुग्णालयाचा भार 3 डॉक्टरांवरच, कर्तव्य बजावणारे डॉक्टर संपाच्या पावित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 01:24 PM2017-10-07T13:24:29+5:302017-10-07T13:26:31+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ तीनच डॉक्टरांवर सोपवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Joshi Hospital's Bhindar loads on the burden of three doctors, in the presence of doctors who perform duty | भाईंदरमधील जोशी रुग्णालयाचा भार 3 डॉक्टरांवरच, कर्तव्य बजावणारे डॉक्टर संपाच्या पावित्र्यात 

भाईंदरमधील जोशी रुग्णालयाचा भार 3 डॉक्टरांवरच, कर्तव्य बजावणारे डॉक्टर संपाच्या पावित्र्यात 

Next

राजू काळे/भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ तीनच डॉक्टरांवर सोपवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डॉक्टरांच्या संख्येत तातडीने वाढ करण्याची मागणी या डॉक्टरांकडून प्रशासनाकडे सतत करण्यात येत आहे. यावर त्वरित कार्यवाही न केल्यास ते डॉक्टर आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात असल्याचे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.  

सुमारे 200 खाटांचे हे रुग्णालय 10 जानेवारीला रुग्णसेवेत दाखल झाले. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवा देण्याच्या प्रतीक्षेत असलेले हे रुग्णालय तूर्तास 100 खाटांच्या क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. हे रुग्णालय सुरुवातीपासूनच तोकड्या वैद्यकीय सोईसुविधायुक्त ठरू लागले आहे. खासगी रुग्णसेवेत बक्कळ पैसा कमावणारे डॉक्टर कमी पगारात पालिकेच्या रुग्णालयात नियुक्त होण्यास उत्सुक नसल्यानेच डॉक्टरांची वानवा असल्याचा दावा प्रशासनाकडून सतत केला जात आहे. 

यामुळे अनेकदा जाहिरातीच्या माध्यमातून डॉक्टर नियुक्तीचा प्रयत्न प्रशासनाने करुनही डॉक्टरांची पुरेशी संख्या अद्याप तोकडीच राहिलेली आहे. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असून एका वैद्यकीय अधिका-याला अनेकदा 24 तासांची रुग्णसेवा नाईलाजास्तव द्यावी लागत आहे. या रुग्णालयात काही स्थानिक खासगी डॉक्टरांनी बाह्य रुग्ण विभागात मोफत सेवा देण्याला सुरुवात केली आहे. रुग्णालयात सध्या छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया विभाग, प्रसुती विभाग, पुरुष व स्त्री वैद्यकीय विभाग, कुपोषित बालक उपचार कक्ष (पोषण पुर्नवसन केंद्र), सोनोग्राफी, अपघात विभाग सुरू आहेत. 
यात वैद्यकीय अधिका-यांसह काही विशेषज्ज्ञांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली असून प्रत्येकी 1 पॅथोलॉजिस्ट, मनोविकारतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ, (नाक, तोंड, घसा) ईएनटी विकार तज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांचा समावेश आहे. हे विशेषज्ज्ञसुद्धा बाह्यरुग्ण विभागात सेवा देऊन दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची आवश्यकतेनुसार तपासणी करतात. परंतु, संध्याकाळी ४ ते सकाळी ९ वाजेदरम्यान महत्त्वाच्या वेळेत मात्र केवळ चार डॉक्टरांवर ५० रुग्णांचा भार सोपवण्यात आला आहे. 

यातील एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अलिकडेच रुग्ण दगावल्याची घटना घडल्याने त्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. यामुळे सध्या तीनच डॉक्टरांवर रुग्णसेवेचा भार टाकण्यात आला आहे. प्रत्यक्षात अस्तित्वातील रुग्णांच्या संख्येनुसार रुग्णालयात १२ डॉक्टरांची आवश्यकता आहे. यावरुन कर्तव्य बजावणा-या तीन डॉक्टरांच्या सहकार्यासाठी आणखी 8 डॉक्टरांची नियुक्ती प्रशासनाकडून होणे अपेक्षित असताना अद्याप पुरेशा डॉक्टरांची नियुक्ती करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे कंटाळलेल्या एका स्त्रीरोगतज्ज्ञाने अलिकडेच राजीनामा दिला आहे. या अपु-या संख्येतच त्या तीन वैद्यकीय अधिका-यांना शवविच्छेदन केंद्रातही सेवा द्यावी लागत असल्याने ते अधिकारी पुरते हैरान झाले आहेत. प्रशासनाने त्वरीत पुरेशा वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांच्या केली जात आहे. 

डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू
पालिकेने पुरेशा डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली असुन त्याच्या जाहिरातीचा मसुदा तयार करण्यात येत आहे. लवकरच थेट मुलाखतीतून निवड झालेल्या डॉक्टरांची नियुक्ती जोशी रुग्णालयात केली जाणार आहे. -डॉ. प्रकाश जाधव, पालिका वैद्यकीय विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी 

Web Title: Joshi Hospital's Bhindar loads on the burden of three doctors, in the presence of doctors who perform duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.