वैद्य यांच्या भूमिकेला जोशींचा सुरुंग

By admin | Published: November 8, 2015 12:26 AM2015-11-08T00:26:08+5:302015-11-08T00:26:08+5:30

देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची

Joshi's role in Vaady's role | वैद्य यांच्या भूमिकेला जोशींचा सुरुंग

वैद्य यांच्या भूमिकेला जोशींचा सुरुंग

Next

नागपूर : देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची भूमिका नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शनिवारी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत संघ पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरी येथे झालेली हत्या व त्यानंतर साहित्यिकांचा पुरस्कार परत करण्याचा घटनाक्रम, यामुळे देशात आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीस संघ जबाबदार असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. एरवी संघाकडून कुठल्याही टीका किंवा आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत नाही, परंतु डॉ. मनमोहन वैद्य यांनी या संदर्भात थेट काँग्रेसविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
मुळात काँग्रेस पक्षच संघाबद्दल असहिष्णू आहे. संघाची वाढ, तसेच जनतेमधून मिळणारी मान्यता या बाबी सहन करणे त्यांना कठीण झाले आहे, असे मत डॉ. वैद्य यांनी व्यक्त केले होते. डॉ. वैद्य यांच्या या प्रत्युत्तरामुळे संघ परिवारातील सदस्यही आश्चर्यचकित झाले होते.
या संदर्भात भय्याजी जोशी यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, त्यांनी ही संघाची भूमिकाच नसल्याचे वक्तव्य दिले. ‘देशात असहिष्णुतेसाठी संघालाचा जबाबदार धरण्याची परंपराच आहे, परंतु प्रत्यक्षात स्थिती काय आहे? अशी आक्रमक भूमिका घेणे हे संघाचे धोरण नाही. आम्ही असे मतदेखील व्यक्त केलेले नाही,’ असे ते म्हणाले.

संघाची नेमकी भूमिका काय?
डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसविरोधातील त्यांचे वक्तव्य ‘टष्ट्वीटर’वरदेखील ‘पोस्ट’ केले होते. शिवाय संघाचे अधिकृत पदाधिकारीच संघातर्फे भूमिका मांडतात, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, परंतु भय्याजी जोशी यांनी ही संघाची भूमिका नसल्याचे प्रतिपादन केल्यामुळे संभ्रम वाढला आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून संघ आक्रमक होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Joshi's role in Vaady's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.