पत्रकार रविकिरण देशमुख मुख्यमंत्र्यांचे माहिती सल्लागार
By Admin | Updated: December 10, 2014 01:24 IST2014-12-10T01:24:27+5:302014-12-10T01:24:27+5:30
पत्रकार रविकिरण देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माहिती व जनसंपर्क सल्लागार म्हणून रुजू झाले. मुंबईत मिड डे या इंग्रजी दैनिकात ते राजकीय संपादक म्हणून कार्यरत होते.

पत्रकार रविकिरण देशमुख मुख्यमंत्र्यांचे माहिती सल्लागार
नागपूर : पत्रकार रविकिरण देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माहिती व जनसंपर्क सल्लागार म्हणून रुजू झाले. मुंबईत मिड डे या इंग्रजी दैनिकात ते राजकीय संपादक म्हणून कार्यरत होते. 1993 साली ते लातूरहून मुंबईत पत्रकारिता करण्यासाठी मुंबईत आले. काही दैनिकात काम केल्यानंतर ते आता या पदावर रुजू झाले आहेत. त्यांना सहसचिव पदाचा दर्जा देण्यात येत असून त्या दर्जाचे असणारे सगळे लाभही त्यांना मिळतील. माध्यमातील पत्रकारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. (प्रतिनिधी)