डेक्कन एक्स्प्रेसचा प्रवास आता संस्मरणीय; विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 08:30 AM2021-05-30T08:30:53+5:302021-05-30T08:31:27+5:30

काचेच्या छतामधून घाटाचे सौंदर्य पाहता येणार

The journey of the Deccan Express is now memorable; The decision to add a Vistadom coach | डेक्कन एक्स्प्रेसचा प्रवास आता संस्मरणीय; विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय

डेक्कन एक्स्प्रेसचा प्रवास आता संस्मरणीय; विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय

Next

पुणे : मध्य रेल्वेच्या ताफ्यात विस्टाडोम कोच दाखल झाले आहेत. हे कोच पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसला जोडण्यात येणार असल्याने पुणेकरांचा हा प्रवास संस्मरणीय होणार आहे. काचेच्या छप्परमुळे प्रवाशांना डब्यात बसूनच घाट, दरी, आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहता येणार आहे.
पर्यटकांना रेल्वे प्रवासात निसर्गसौंदर्यचा आनंद लुटता यावे यासाठी विस्टाडोम कोचची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चेन्नई येथील आयसीएफ कोच फॅक्टरीमध्ये या डब्यांच्या निर्मितीस सुरुवात झाली आहे. रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार १० पैकी दोन डबे तयार करून मध्य रेल्वेला देण्यात आले आहेत. उर्वरित डब्यांचे कामदेखील सुरू झाले आहे. एका डब्याची किंमत पाच कोटींपेक्षा जास्त आहे.

विस्टाडोमची वैशिष्ट्ये... 
देशातील पहिला डबा, यापूर्वी आयसीएफ डबे जोडले होते.
ताशी १८० किमी वेगाने धावणारा. देशात सध्या हा वेग सर्वाधिक आहे.
डब्यांच्या एका बाजूला मोठी मोकळी जागा. प्रवासी उभे राहून प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.
एका डब्यात ४४ सीटची आसन क्षमता. सीट १८० डिग्रीमध्ये फिरतात.
संगीतप्रेमींसाठी डिजिटल डिस्प्ले स्क्रीन आणि स्पिकर्स,  वायफायची सुविधा.

विस्टाडोमचा देशात कुठे वापर : काश्मीर व्हॅली, अराकू व्हॅली, 
कलका-शिमला टॉय ट्रेन, नेरळ-माथेरान टॉय ट्रेन, नीलगिरी माउंटन रेल्वे, मुंबई-मडगाव जनशताब्दी रेल्वे

मध्य रेल्वेला दोन विस्टाडोम कोच प्राप्त झाले. यातील एक कोच डेक्कन एक्स्प्रेसला जोडण्याचा निर्णय झाला. कोरोनामुळे रेल्वे सेवा प्रभावित आहे. परिस्थिती सामान्य झाल्यावर हा डबा जोडण्यात येईल.
-ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

Web Title: The journey of the Deccan Express is now memorable; The decision to add a Vistadom coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.