हंगेरीच्या मुक्तीचा आनंद
By admin | Published: May 5, 2016 05:48 AM2016-05-05T05:48:26+5:302016-05-05T05:48:26+5:30
युरोपमधला अलीकडच्या काळातला एक संदर्भ लक्षणीय आहे. १९८९ साली पूर्व युरोपवरचा रशियाचा प्रभाव जवळपास संपुष्टात आला. युरोपने तेव्हा मोठी राजकीय घुसळण अनुभवली.
Next
युरोपमधला अलीकडच्या काळातला एक संदर्भ लक्षणीय आहे. १९८९ साली पूर्व युरोपवरचा रशियाचा प्रभाव जवळपास संपुष्टात आला. युरोपने तेव्हा मोठी राजकीय घुसळण अनुभवली. पूर्व आणि पश्चिम अशी जर्मनीची विभागणी करणारी बर्लिनची भिंत कोसळली आणि जर्मनीचे ऐतिहासिक एकीकरण झाले. याच काळात हंगेरीवरचा साम्यवादाचा प्रभाव पूर्णत: संपला आणि तो लोकशाही देश बनला. या मुक्तीचा आनंद साजरा करण्यासाठी १९९0 साली हंगेरीने कार्टुन्सचे जागतिक प्रदर्शन भरविले होते.