न्या़ थूल यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबीयांची भेट
By admin | Published: October 7, 2015 01:06 AM2015-10-07T01:06:43+5:302015-10-07T01:06:43+5:30
औसा तालुक्यातील गोंद्री येथील एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना नुकतीच घडली़ या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती
लातूर : औसा तालुक्यातील गोंद्री येथील एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना नुकतीच घडली़ या
प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी़ एल़ थूल यांनी मंगळवारी गोंद्री येथे पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले़ समाजकल्याण विभागाच्या वतीने ‘त्या’ कुटुंबाला १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा धनादेशही थूल यांच्या हस्ते देण्यात आला़
गोंद्री येथील दलित कुटुंबातील शुंभागी बळीराम अजुने या अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा बलात्कार करुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेने लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली.
शनिवारी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालावरून औसा पोलीस ठाण्यात शनिवारी सात नराधमांविरोधात बलात्कार, खून आणि अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सातपैकी सहा नराधमांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस संरक्षणाच्या सूचना
गोंद्री येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणानंतर आता आरोपींकडून अर्जुने कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहे. त्यांना पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना न्यायमूर्ती थूल यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
सीआयडी चौकशीची मागणी
घटनेच्या प्रारंभीपासूनच या प्रकरणात औसा पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे या घटनेचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी अर्जुने कुटुंबीयाने आयोगाकडे केली.