पोलीस निरीक्षकाला धमकावणाऱ्या दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी
By admin | Published: December 26, 2015 01:45 AM2015-12-26T01:45:55+5:302015-12-26T01:45:55+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी सीबीआयच्या मदतीला देण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाला धमकावणाऱ्या दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी सीबीआयच्या मदतीला देण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाला धमकावणाऱ्या दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या दाम्पत्याने पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत लाखांची खंडणी मागितली होती.
चंद्रकांत मोहिते आणि त्याची पत्नी संगिता अशी आरोपींची नावे आहेत. घोडके यांच्या मोबाइलवर २ डिसेंबर रोजी आरोपींनी मेसेज पाठवला होता. डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास थांबवावा. तसेच तपास न थांबवल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागण्यात आली होती. आतापर्यंत १५ खून केल्याचेही नमूद करण्यात आले होते.