१५ जुलैपर्यंत शासनालाही तत्त्वत: पाठिंबा- संजय राऊत

By admin | Published: June 12, 2017 08:06 PM2017-06-12T20:06:14+5:302017-06-12T20:06:14+5:30

शासनाने तत्वत: कर्जमाफी दिल्याचे जाहीर केले असून तत्वत: शब्दाचा अर्थ काय?

By July 15, the government also strongly supported: Sanjay Raut | १५ जुलैपर्यंत शासनालाही तत्त्वत: पाठिंबा- संजय राऊत

१५ जुलैपर्यंत शासनालाही तत्त्वत: पाठिंबा- संजय राऊत

Next

ऑनलाइन लोकमत
पाचोरा (जि. जळगाव), दि. 12 - शासनाने तत्वत: कर्जमाफी दिल्याचे जाहीर केले असून तत्वत: शब्दाचा अर्थ काय? शासनालाही २५ जुलैपर्यंत शिवसेनेचा तत्वत: पाठिंबा असेल असा गर्भित इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला पाचोरा येथून ह्यमी कर्जमुक्त होणारह्ण या शेतकरी मेळाव्यात दिला.
ह्यमी कर्जमुक्त होणारह्ण या अभियानात येथील राजीव गांधी टाऊन हॉल मध्ये १२ रोजी दुपारी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर सडकून टीका केली. तत्वत: या शब्दाचा अर्थ काही समजत नाही. ही भाषा फडणवीस महाजनांची आहे. ठाकरेंची नाही. देतो का? कानाखाली वाजवू ही आमची भाषा आहे. उत्तर प्रदेशात मागणी, मोर्चे, आंदोलने नसताना कोणताही अभ्यास न करता योगी आदित्यनाथ यांनी २४ तासाच्या आत कर्जमाफी केली. येथेच अभ्यास का करावा लागतो. तीन वर्षे झाली अजून अभ्यास बाकी कसा? असा खोचक सवाल करीत विरोधी पक्षात असताना अभ्यासू माणूस म्हणून असणारे फडणवीस आता कोणत्या अभ्यास करता आहेत असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी महाराष्ट्रातील भाषणात किसान आत्महत्या करतो याबद्दल काँग्रेसवर टीका करीत होते. आता तीच मागणी आम्ही करतो तर ती अडचण कशी होते? ही शासनाची फसवाफसवी आहे. मुख्यमंत्री म्हणतात हे शेतकऱ्यांचे आंदोलन नव्हते. शेतकऱ्यांबरोबर समाजकंटक होते. त्यांनी लूट केली. होय, शिवसैनिक होते त्यांचेवर गुन्हे झाले मात्र शासनातील मंत्री लुटतात त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असेही राऊत म्हणाले.
जुलैमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा मोर्चा उध्दवजींच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडकणार आहे. तेव्हा भूकंपाचे धक्के उध्दवजीच देतील असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाच बघायचे आहे, असेही ते म्हणाले.
नाव न घेता खडसेंवर टीका
शिवसेनेला संपवणारे संपलेत हे सांगताना राऊत यांनी मुक्ताईनगरचे उदाहरण दिले. शिवसेनेबरोबरची युती तोडली ते धाडस मी केले म्हणून मिरवणारे आज कोठे आहेत? ते फक्त जेलमध्येच जायचेच बाकी आहे असेही राऊत यांनी एकनाथ खडसेंचे नाव न घेता सांगितले.
शिवसेनेची सत्ता येणारच
उद्या शिवसेनची सत्ता येणारच, तिची भिस्त उत्तर महाराष्ट्रवर असेल. विदर्भात भाजपा, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादी तर उत्तर महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर येईल. देशाचे लक्ष शिवसेनेकडे असते. मोदीही शिवसेनेला घाबरतात असे सांगून विमानातून, हेलिकॉप्टरमधून पैसे पुरवून निवडणुका जिंकल्याचे राऊत यावंनी भाजपाला उद्देशून सांगितले. आम्ही सरकारमध्ये आहोत ते का आहोत? सत्तेत राहून भाजपाच्या छाताडावर शिवसेना उभी राहते, ताठ मानेने सरकारवर जबर ठेवली आहे तेव्हा कर्जमुक्त होवून ७/१२ कोरा केल्याशिवाय सेना स्वस्थ बसणार नाही असे राऊत म्हणाले.
सरकारला जाग आणली- किशोर पाटील
आमदार किशोर पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या धमकी, इशाऱ्यामुळेच सरकार नरमले. सेनेने सरकारला जाग आणण्याचे काम केले. जिल्हा बँकेकडे पैसे नाही. शासन म्हणते उद्यापासून नियमीत कर्ज देणार, कोठून देणार? जिल्हा बँकेकडे २१० कोटी जुन्या नोटा आहेत. जेडीसीसीने मुक्ताईनगर साखर कारखान्याला ५१ कोटी दिले. मध्येच गुलाबराव पाटील यांनी खोचक प्रश्न केला की त्यांना दिले इतरांचे काय? यावर किशोर पाटील म्हणाले, ते चांगला ग्राहक असल्याने त्यांना दिले. यर शासनाने तत्वत: का होईना कर्जमाफी दिल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मात्र नियमित कर्ज भरणाऱ्यांनी काय पाप केले? त्यांनाही मदत करा अशी मागणी त्यांनी केली.
गुलाबरावांनी घेतला समाचार
गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बँकेचा खरपूस समाचार घेताला व बँकेचे व्हा.चेअरमन किशोर पाटील यांना कोंडीत पकडले. जिल्हा बँक जिल्ह्यातील एका डाकूला ५१ कोटी कर्ज देते. मग चोपड्याच्या सेनेच्या कैलास पाटील यांच्या ताब्यात असलेल्या सूतगिरणीला का देत नाही असा सवाल करीत किशोर पाटील पदाधिकारी असलेल्या बँकेचा समाचार घेतला. तुमच्या कपाळकरंट्या बँकेने आमच्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. आम्ही शिवसैनिक आहोत, शेतकऱ्यांसाठी वीज, कर्जमाफी आदी प्रश्नांवर रस्त्यावर आहोत. शासनाने तत्वत: कर्जमाफी दिल्याबद्दल मंत्री या नात्याने तत्वत: स्वागत करतो अशी कोपरखळी मारली. सरकारने शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करुन सरसकट कर्जमुक्त करावी अशी मागणीही गुलाबराव पाटील यांनी केली. संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांचेही भाषण झाले.
मेळावा ४ वाजत सुरु झाला. आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार आर.ओ.पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, महानंदा पाटील, जळकेकर महाराज, अ‍ॅड.दिनकर देवरे, रावसाहेब पाटील, भडगावचे विकास पाटील, संजय पाटील, देविदास पाटील, दीपक पाटील, मुकुंद बिल्दीकर, अरुण पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील, शरद पाटे, डॉ.भरत पाटील, रहेमान तडवी, शीतल सोमवं;शी, अंबादास सोमवंशी, बापू हटकर, किशोर बारवकर, गंगाराम पाटील, दत्ता जडे, रमेश बाफना आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले तर आभार गणेश पाटील यांनी मानले.

Web Title: By July 15, the government also strongly supported: Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.