मधुमेहाला कंटाळून वृद्धाने घेतली इमारतीवरुन उडी

By admin | Published: July 5, 2016 08:17 PM2016-07-05T20:17:25+5:302016-07-05T20:17:25+5:30

मधुमेहाला कंटाळून ६३ वर्षीय वृद्धाने तीन मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेत आत्महत्या केली. भिकू गोविंद प्रभाकर असे मृत वृद्धाचे नाव असून याप्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत

Jump from the building taken by aging elderly to diabetes | मधुमेहाला कंटाळून वृद्धाने घेतली इमारतीवरुन उडी

मधुमेहाला कंटाळून वृद्धाने घेतली इमारतीवरुन उडी

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ५ : मधुमेहाला कंटाळून ६३ वर्षीय वृद्धाने तीन मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेत आत्महत्या केली. भिकू गोविंद प्रभाकर असे मृत वृद्धाचे नाव असून याप्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलुंड एलबीएस मार्गावरील कामगार वसाहतीत प्रभाकर हे मुलासोबत राहायचे. कामगार रुग्णालयात ते सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. सहा वर्षापूर्वी गँगरीनमुळे त्यांचा एक पाय कापावा लागला. त्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने अंथरुणाला खिळले होते. कामावर जाणे शक्य नसल्याने त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलाला कामावर घेण्यात आले. मधुमेहाच्या वाढत्या आजाराला कंटाळून सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेत आत्महत्या केली. जोराचा आवाज झाला म्हणून तळमजल्यावरील कुटुंबियांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तेव्हा प्रभाकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. कुटुंबियांना माहिती देत त्यांना तत्काळ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलुंड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली.

Web Title: Jump from the building taken by aging elderly to diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.