खटल्याला हजर राहण्याची जुंदालची मागणी फेटाळली
By admin | Published: June 6, 2014 12:36 AM2014-06-06T00:36:02+5:302014-06-06T00:36:02+5:30
नाशिक मिलेटरी कॅम्पवरील हल्ल्याचा कट या खटल्यांच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची अतिरेकी अबू जुंदालची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली़
Next
>मुंबई : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण, नाशिक मिलेटरी कॅम्पवरील हल्ल्याचा कट या खटल्यांच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची अतिरेकी अबू जुंदालची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली़
विविध अतिरेकी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या जुंदालला दिल्ली पोलिसांनी अटक केली़ मुंबईवर हल्ला करणा:या 1क् अतिरेक्यांना हिंदी भाषा शिकवण्याचा व प्रशिक्षण देण्याचा आरोप जुंदालवर आह़े यासह वरील दोन प्रकरणांतही तो आरोपी आह़े त्यामुळे अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांकडून जुंदालचा ताबा घेतला़ त्यानंतर त्याच्याविरोधातील खटल्याचे कामकाज सुरू झाल़े मात्र त्याच्या जिवाला धोका असल्याचे मुंबई पोलिसांनी राज्य शासनाला कळवल़े त्याची दखल घेत शासनाने जुंदालला खटल्याच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर न करण्याचा अध्यादेश जारी केला़
त्याला जुंदालने याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिल़े हा अध्यादेश मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आह़े खटल्याच्या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहिलो नाही तर स्वत:ची बाजू कशी मांडणार, असा सवाल करत
हा अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी जुंदालने केली़ याला सरकारी वकील ज़ेपी़ याज्ञिक यांनी विरोध केला़