जूनमध्ये केवळ 41 टक्केच पाऊस
By admin | Published: June 30, 2014 02:03 AM2014-06-30T02:03:54+5:302014-06-30T02:03:54+5:30
या महिन्यात राज्यात केवळ 41 टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
Next
>पुणो : मान्सून दाखल होऊनही पाऊस गायब असल्याने राज्यात पूर्ण जून कोरडा गेला आहे. या महिन्यात राज्यात केवळ 41 टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सर्वात कमी पाऊस मराठवाडय़ात झाला आहे. तेथे 75 टक्के पाऊस कमी झाला आहे. प्रारंभीच पाऊस कमी पडल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहे.
गेल्यावर्षी राज्यात मान्सूनने भरभरून पाऊस पाडला होता. त्यामुळे यंदाही चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतक:यांसह सामान्यांनाही होती. यंदा मान्सून राज्यात उशिरा दाखल झाला तरी पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र 11 जूनला दाखल झाल्यानंतर एक आठवडा कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र आठवडय़ाभरातच तो तेथूनही गायब झाला. साधारणत: 15 जूनर्पयत मान्सून राज्याच्या बहुतांश भागात पोहोचलेला असतो. मात्र यंदा जून महिना संपला तरी मराठवाडय़ात मान्सून पोहोचलेला नाही. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मान्सून आला असला तरी पाऊस गायब असल्याची स्थिती आहे. पावसाने आणखी दडी मारली तर राज्यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)
सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्ह्यात
राज्यात सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्हय़ात पडला असून, तो सरासरीपेक्षा 89 टक्के कमी आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात 87 टक्के कमी पाऊस आणि मुंबईमध्ये 86 टक्के कमी पाऊस पडला आहे. सांगलीमध्ये चांगला पाऊस झाला असून, तो सरासरीच्या 68 टक्के इतका झाला आहे. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये 61 टक्के पाऊस झाला आहे.