दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची थट्टा
By admin | Published: March 10, 2016 03:37 AM2016-03-10T03:37:32+5:302016-03-10T03:37:32+5:30
शालेय शिक्षण विभागाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र, राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र, राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला नसल्याने, शासकीय आणि अशासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
आयटीआय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्याचा निर्णयच घेतला नसल्याची माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. याबाबत अशासकीय आयटीआय संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते म्हणाले की, ‘बसचा पास काढण्याचे पैसे नसल्याने बहुतेक विद्यार्थी आयटीआयमध्ये येत नाहीत. त्यात राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने आनंद झाला होता. मात्र, खासगी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कमाफी देणाऱ्या शासनाला प्रशिक्षणार्थींना शुल्कमाफी देणे जरूरीचे का वाटले नाही? याचा अर्थ कळलेला नाही. त्याचा खुलासा सरकारने करायला हवा. (प्रतिनिधी)