भीमगीताच्या रिंगटोनने घेतला तरुणाचा जीव

By admin | Published: May 23, 2015 01:49 AM2015-05-23T01:49:56+5:302015-05-23T01:49:56+5:30

मोबाइलवर भीमगीताची रिंगटोन वाजल्याच्या रागातून सागरची हत्या झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात केली आहे़

Junk's life | भीमगीताच्या रिंगटोनने घेतला तरुणाचा जीव

भीमगीताच्या रिंगटोनने घेतला तरुणाचा जीव

Next

शिर्डीतील घटना : मृत सागरच्या कुटुंबीयांचा पुरवणी जबाब
शिर्डी (जि. अहमदनगर) : दलित तरुणाच्या येथील हत्येस गंभीर वळण मिळाले असून, मोबाइलवर भीमगीताची रिंगटोन वाजल्याच्या रागातून सागरची हत्या झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात केली आहे़ मोबाइलच्या रिंगटोनवरून सागरची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र आता पुरवणी जबाबातून हत्येचा अधिक स्पष्टपणे उलगडा झाला आहे.
आम्हाला सरकारकडून कोणतीही मदत नको, मात्र हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सागरचे वडील सुभाष शेजवळ यांनी केली आहे़ १६ मे रोजी सायंकाळी सागर शेजवळची (२२) निर्घृण हत्या झाल्याचे उघड झाले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विशाल कोते व त्याचे साथीदार येथील एका बीअर शॉपमध्ये बसलेले असताना त्यांच्या जवळच बसलेल्या सागरच्या मोबाइलची रिंगटोन वाजल्याच्या प्रकरणातून त्याला मारहाण करून दुपारी दीडच्या सुमारास त्याचे अपहरण करण्यात आले होते़ त्यानंतर त्याचा शिंगवे परिसरात निर्घृण खून करण्यात आल्याचे गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीत मारहाण झाल्यानंतर खून केल्याचे म्हटले होते़ (प्रतिनिधी)

मुख्य आरोपी विशाल कोते व रूपेश वाडेकर यांच्यासह चौघांना गोवा व कोल्हापुरातून अटक केली आहे़ अन्य काही आरोपी फरार आहेत़ त्यांच्यावर अपहरण, खून व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे़ न्यायालयाने आरोपींना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: Junk's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.