तयार रहा! थोड्याच वेळात आकाशात दिसणार अद्भूत नजारा; गुरू-शनी ग्रह घेणार गळाभेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 06:48 PM2020-12-21T18:48:08+5:302020-12-21T18:50:59+5:30
Jupiter and Saturn conjunction: नैऋत्य दिशेला हे दोन ग्रह अशा कोणात दिसणार आहेत की वाटेल ते एकमेकांची गळाभेट घेत आहेत. हा योगायोग मकर राशीमध्ये होत आहे.
आज सायंकाळी सुर्यास्तानंतर आकाशात एक अद्भूत नजारा दिसणार आहे. हा योग तब्बल ८०० वर्षांनी जुळून आला आहे. संध्याकाळी ७.३० ते ७.५० या काळात सूर्यमालेतील सर्वात मोठाग्रह गुरु आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. आयुष्यात पुन्हा अशी संधी येणार नाही, कारण य़ानंतर हे ग्रह शेकडो वर्षांनी एकत्र येतील. याच कारणामुळे आज गुगलने देखील डुडल बनविले आहे.
नैऋत्य दिशेला हे दोन ग्रह अशा कोणात दिसणार आहेत की वाटेल ते एकमेकांची गळाभेट घेत आहेत. हा योगायोग मकर राशीमध्ये होत आहे. तुम्ही या दोन ग्रहांचे मिलन तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार आहात. जानेवारीमध्ये मकर राशीमध्ये शनी प्रवेश करणार आहे. नोव्हेंबरमध्ये गुरु ग्रह मकर राशीमध्ये आला आहे.
याला ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात गुरु व शनि है दौन ग्रह यापूर्वी १२२६ आणि १६२३ मध्ये जवळ आले होते. त्यानंतर आता २१ डिसेंबर २०२० रोजी दोन ग्रह कमी अतरावर येण्याची दुर्मीळ खगोलीय योग आला आहे.
पृथ्वीवरून अगदी ०.१ डिग्री अंतरावर दोन्ही ग्रहांना एकाचवेळी निरीक्षण व अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. वीस वर्षांपूर्वी हे परस्परांचे जवळ आले होते.शनि सुमारे १२ डिग्री आणि गुरु ३० डिग्रीपर्वत पृथ्वीवरील वर्षात प्रवास करेल. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी १८ डिग्री जवळ येतील आणि जवळ येण्यास २० वर्षे लागतील शनि आणि गुरूमधील अंतर ७३० दशलक्ष दिवस किलोमीटर आहे . शेवटच्या वेळी म्हणजेच २८ मे २००० रोजी है अंतर १.२५ डिग्री होते.
कन्झिकेशन्स म्हणजे काय ?
कन्झिकेशन्स म्हणजे जेव्हा दोन वस्तू आकाशात एकमेकाच्या जवळ दिसतात. गुरु आणि शनि यांचा एक कन्झिकेशन्स- दर २० वर्षांतून एकदाच घडले- याला एक ग्रेट कन्झिकेशन्स म्हणतात.
या संपूर्ण खगोलीय घटनेचा आपण आपल्या कुटुबासमवेत आनंद घ्यावा, यापूर्वी १२२६ व १६२३ मध्ये अशा प्रकारची दुर्मिळ खगोलीय घडलेली होती, ही आपणास डोळ्यांनी देखील पाहता येते. नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल.
- राहुल दास, संग्रहालय अभिरक्षक, सोलापूर विज्ञान केंद्र