लोक ऐकताहेत तोपर्यंतच त्यांना पटवून द्या - नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 02:53 AM2019-09-24T02:53:17+5:302019-09-24T02:53:39+5:30

विधानसभा प्रचाराची फुंकली तुतारी

Just convince people as long as they listen - nadda | लोक ऐकताहेत तोपर्यंतच त्यांना पटवून द्या - नड्डा

लोक ऐकताहेत तोपर्यंतच त्यांना पटवून द्या - नड्डा

Next

पुणे : तुम्ही राष्ट्रभक्तांबरोबर काम करत आहात हे तुमचे भाग्य आहे. लोक आता आपले ऐकत आहेत. हीच वेळ योग्य आहे. त्यांना राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच सरकार आणायचे आहे, हे सांगा असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले. त्यांनी राज्याची संगीत खुर्ची केली होती, आम्ही ५ वर्षे भक्कम मुख्यमंत्री दिला असे ते म्हणाले.

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, संघटनात्मक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा सोमवारी सायंकाळी येथे नड्डा यांच्या उपस्थितीत झाला. झाला. राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश हेही त्यांच्यासमवेत होते. विधानसभेच्या प्रचाराचे बिगूल फुंकताना नड्डा यांनी ३७० कलम तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच जास्त भर दिला.

नड्डा म्हणाले, काश्मिरमधील ३७० कलमामुळे तिथे अनेक समस्या होत्या. मोदी व शहा यांनी इच्छाशक्ती दाखवली. राज्यसभेत बहुमत नसतानाही तिथे भाजपच्या सदस्यसंख्येपेक्षा जास्त मतांनी हा विषय मंजूर झाला. ही रणनीती त्या दोघांची होती. आता काश्मीर व देश एक झाला आहे. मुलींना राज्याबाहेर लग्न केले तरीही वडिलोपार्जित संपत्तीत वाटा, अनुसुचित जातींना लोकसभा, विधानसभेत संधी असे अनेक फायदे होणार आहेत.

Web Title: Just convince people as long as they listen - nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.