भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी अवघी आठ वाहने

By admin | Published: April 27, 2016 02:41 AM2016-04-27T02:41:23+5:302016-04-27T02:41:23+5:30

भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मुंबईत केवळ आठ वाहने आहेत़

Just eight vehicles to catch nook dogs | भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी अवघी आठ वाहने

भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी अवघी आठ वाहने

Next

मुंबई: भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मुंबईत केवळ आठ वाहने आहेत़ त्यामुळे कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या मोहिमेला फटका बसत आहे़ कुत्रे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची संख्या तत्काळ वाढविण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य समितीने पालिका आयुक्तांकडे केली आहे़
कुत्र्यांना ठार मारण्यास बंदी असल्याने पालिकेने १९९८ पासून निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली़ या मोहिमेंतर्गत बिगर शासकीय संस्था भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करीत आहेत. मात्र, वाहनांची संख्या कुत्र्यांच्या संख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढविण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत करण्यात आली़ प्रत्येक वॉर्डमध्ये किमान एक वाहन असावे, असा आग्रह सदस्यांनी धरला़ असा प्रस्तावच आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
>बिगर शासकीय संस्था अपुऱ्या मुंबईत नऊ बिगर शासकीय संस्थांच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात होते. योगदान नसलेल्या पाच संस्थांना पालिकेने नारळ दिला़ त्यामुळे निर्बीजीकरण करत असल्याने संस्थांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या पटलावर प्रशासनाने आणला होता़ मात्र, हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठविण्यात आला आहे़
>तज्ज्ञांचा सल्ला घेणार
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम प्रभावी करण्यासाठी पालिकेने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे़ यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे़ त्याचबरोबर, बिगर सरकारी संस्थांची संख्याही वाढविण्यात येणार आहे़

Web Title: Just eight vehicles to catch nook dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.