अवघ्या चार तासांत इंदापूर झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 03:29 AM2017-06-30T03:29:08+5:302017-06-30T03:29:08+5:30

संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचे अकलूजकडे प्रस्थान झाल्यानंतर अवघ्या चार तासांत इंदापूर शहराची साफसफाई झाली.

In just four hours, Indapur became famous | अवघ्या चार तासांत इंदापूर झाले चकाचक

अवघ्या चार तासांत इंदापूर झाले चकाचक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचे अकलूजकडे प्रस्थान झाल्यानंतर अवघ्या चार तासांत इंदापूर शहराची साफसफाई झाली. बाळा ढवळे मित्र परिवार, श्रीनाथ मित्रमंडळ, शिवज्योत तरुण मित्रमंडळ, कै. अजित ढवळे फाउंडेशन व सरस्वतीनगर येथील नागरिकांनी ही किमया केली.
सकाळी ६ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळा ढवळे यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली राहुल जावीर, हमीद शिकलगर, जावेद सय्यद चाचा, पप्पू सय्यद, अल्ताफ काझी, संजय चव्हाण, अ‍ॅड. आशुतोष भोसले, पंकज नरुटे, निसार शेख, रवी क्षीरसागर, अजिंक्य जावीर व इतर कार्यकर्त्यांनी सरस्वतीनगरपासून स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली. रिंगण सोहळ्याचे पटांगण, कसबा पेठ, नेहरू चौक, शहराचा मुख्य रस्ता, खडकपुरा, श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे प्रांगण, पंचायत समिती, काँग्रेस भवनपर्यंतच्या परिसरातील सफाई त्यांनी केली.
या कार्याबद्दल कर्मधर्म संयोगाने मारुती मंदिराजवळ असणाऱ्या पालखी विश्वस्तांनी या सर्वांचा सत्कार केला. सरस्वतीनगर भागात असणाऱ्या बाळा ढवळे मित्र परिवार, श्रीनाथ मित्र मंडळ, शिवज्योत तरुण मित्र मंडळ, कै. अजित ढवळे फाउंडेशन यांच्या माध्यमातून तरुणांचा मोठा संच सामाजिक कार्यक्रमात सक्रिय असतो. लोकांच्या वैयक्तिक व सामूहिक अडचणीच्या वेळी तो धावून जातो ही नित्याची बाब आहे.
याही वेळी बाळा ढवळे यांच्या हाकेसरशी धावून येऊन या तरुणांनी स्वच्छता मोहीम चुटकीसरशी फत्ते केली. तरुणांमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी होती. त्यांनी हिरिरीने हातभार लावून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

Web Title: In just four hours, Indapur became famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.