अवघ्या पाच रुपयांत करा इसीजी

By admin | Published: January 18, 2016 08:09 PM2016-01-18T20:09:00+5:302016-01-18T21:20:33+5:30

सध्या आरोग्याचे प्रश्न तर दिवसागणिक वाढताहेत आणि आरोग्यसुविधांच्या किंमतीही झपाट्याने वाढत चालल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान हे निश्चितपणे उपकारक ठरू शकते.

Just make it in five rupees | अवघ्या पाच रुपयांत करा इसीजी

अवघ्या पाच रुपयांत करा इसीजी

Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.१८ - सध्या आरोग्याचे प्रश्न तर दिवसागणिक वाढताहेत आणि आरोग्यसुविधांच्या किंमतीही झपाट्याने वाढत चालल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान हे निश्चितपणे उपकारक ठरू शकते. याचे अतिशय मार्मिक उदाहरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून दिले. ते म्हणाले, सध्या साधा इसीजी काढायचा तर दवाखान्यात अथवा पॅथॉलॉजी लॅबमध्ये जावे लागते. त्यासाठी किमान ५०० रुपये मोजावे लागतात. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कमाल अशी आहे की ते त्यावरदेखील मात करू शकेल.
राहुल रस्तोगी या तरुण तंत्रज्ञाने त्यासाठी खास पद्धतीचे अॅप विकसीत केलेले आहे. त्याच्या नातलगाचे हृदयविकारानेच निधन झाले. तेव्हा त्याला त्याची निकड अधिक भासली. राहुलने वर्षभर मेहनत घेऊन मोबाईलसारखेच एक उपकरण विकसीत केले आहे. शरीरावर हे उपकरण सहा ठिकाणी स्पर्श केल्यानंतर त्या व्यक्तीचा इसीजी संबंधित डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅपवर जाईल आणि डॉक्टरांना रुग्णाच्या हृदयाची स्थिती एका सेकंदात समजू शकेल व तत्काळ उपाययोजना करून रुग्णाचा जीव वाचवणोही शक्य़ होऊ शकेल. विशेष म्हणजे हे अॅप त्याने अवघ्या ५ रुपयांना उपलब्ध करून दिले आहे. ही किमया केवळ विज्ञानाचीच आहे, असे मत डॉ. माशेलकरांनी व्यक्त केले. 
नोएडा स्थित राहुल रस्तोगी याने त्याच्या अगास्ता सॉफ्टवेअर या कंपनीच्या माध्यमातून हे अॅप विकसीत केले आहे. पोर्टेबल, क्रेडीट कार्ड आकाराच्या या इसीजी मॉनेटरला त्याने संकेत असे नाव दिले आहे. ब्लूटूथच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर स्मार्टफोनशी वायरलेस पद्धतीने जोडलेले असते. त्यातून हृदयाची सद्यस्थिती कशी आहे याचा अंदाज येऊ शकतो. अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही पद्धतीच्या स्मार्टफोनवर हे अॅप्लीकेशन चालू शकते. या माध्यमातून त्याने तंत्रज्ञानाच्या बळावर वेळ आणि पैसा दोन्हीची बचत करून दाखवली आहे. छातीत दुखणे, श्वास घेताना त्रास होणे, हृदयाचे ठोके अनियमित पडणे अशी लक्षणे आढळल्यास या अॅपचा तत्काळ वापर शक्य आहे आणि संबंधित डॉक्टरला त्याची माहिती तत्काळ व्हॉट्सअॅप, इमेल द्वारे कळू शकते.

 

Web Title: Just make it in five rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.