जोतिबा फुलेंच्या विचारांचा प्रसार आवश्यक-चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:53 AM2018-03-05T05:53:39+5:302018-03-05T05:53:39+5:30
सध्या संविधानच धोक्यात आल्याचे चित्र देशात उभे राहिले आहे. संविधानाला वाचवायचे असेल, तर जोतिबा फुले यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवायला हवेत, असे प्रतिपादन
मुंबई : सध्या संविधानच धोक्यात आल्याचे चित्र देशात उभे राहिले आहे. संविधानाला वाचवायचे असेल, तर जोतिबा फुले यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवायला हवेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केले. मुंबईत दोन दिवसीय अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३९व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जोतिबा फुलेंचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच हे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते उपस्थित राहू शकले नाहीत. मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघात या अधिवेशानाचे आयोजन करण्यात आले होते.