के/ईस्ट वॉर्ड - दावेदारांसह उत्सुकांची चाचपणी सुरू

By admin | Published: January 30, 2017 09:56 PM2017-01-30T21:56:54+5:302017-01-30T21:56:54+5:30

नव्या प्रभाग रचनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे

K / East Ward - Continued checking of eagles with the claimants | के/ईस्ट वॉर्ड - दावेदारांसह उत्सुकांची चाचपणी सुरू

के/ईस्ट वॉर्ड - दावेदारांसह उत्सुकांची चाचपणी सुरू

Next

टीम लोकमत : मुंबई

नव्या प्रभाग रचनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. युतीबाबत अद्यापही संभ्रम असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतंत्ररीत्या लढण्याची तयारी दर्शवली आहे. विशेषत: दावेदारांसह उत्सुक उमेदवारांमध्येही आघाडी आणि युतीबाबत नाराजी असल्याने प्रत्येकानेच वेगळी चूल मांडण्याबाबतचे संकेत दिले आहेत. मुंबईच्या उपनगरात अशीच काहीशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘के-ईस्ट’ वॉर्डमध्येही राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू झाली आहे.

‘के-ईस्ट’ वॉर्डमध्ये नव्या प्रभाग रचनेनुसार १५ प्रभाग निर्माण झाले आहेत, तर गतवर्षीही या वॉर्डमध्ये पंधराच प्रभाग होते. परिणामी प्रभागांची संख्या कमीअधिक झाली नसली तरी प्रभागांच्या सीमांमध्ये फेरबदल झाले आहेत. या कारणास्तव विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे. या वॉर्डात खुल्या गटातील महिलांसाठी पाच प्रभाग आरक्षित आहेत. तीन प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असून, एक प्रभाग इतर मागासवर्गीय (महिला) म्हणून आरक्षित आहे. उर्वरित प्रभाग खुले असल्याने उमेदवारांसह दावेदारांमध्ये चुरस रंगली आहे.

‘के-ईस्ट’ वॉर्डमध्ये मजास, मरोळ, सीप्झ, गुंदवली, एमआयडीसी, जे.बी. नगर, कोलडोंगरी आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या वॉर्डातील अनेक नागरी प्रश्न पूर्णत: सोडवण्यात आलेले नाहीत. परिणामी याच नागरी प्रश्नांचे भांडवल नवे उमेदवार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे या वॉर्डात अनंत नर, केसरबेन पटेल, विनी डिसुझा, ज्योती अळवणी असे दिग्गज नगरसेवक आहेत. यांच्या खेळीकडेही विरोधकांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच इतर वॉर्डप्रमाणे येथेही राजकीय पक्षांकडून दावेदारांसह उत्सुकांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, निवडणुकीच्या धुमाळीत उत्तरोत्तर यात भरच पडणार आहे.

............................................................

प्रभाग क्रमांक ७२

एकूण लोकसंख्या ५९०५५

अनुसूचित जाती १६६६

अनुसूचित जमाती ३५५

प्रभागाची व्याप्ती : इस्माईल युसूफ कॉलेज, नटवरनगर, बांद्रेकरवाडी, लक्ष्मीनगर

............................................................

प्रभाग क्रमांक ७३

एकूण लोकसंख्या ५४२१०

अनुसूचित जाती २५३०

अनुसूचित जमाती १८७

प्रभागाची व्याप्ती : श्यामनगर, मजास बस डेपो, जोगेश्वरी गुंफा, जनता कॉलनी

............................................................

प्रभाग क्रमांक ७४

एकूण लोकसंख्या ५१२९२

अनुसूचित जाती १६६३

अनुसूचित जमाती ५०५

प्रभागाची व्याप्ती : दुर्गानगर, रूपनगर, गणेशनगर, कमाल अमरोही स्टुडिओ

............................................................

प्रभाग क्रमांक ७५

एकूण लोकसंख्या ५४३९९

अनुसूचित जाती २५७३

अनुसूचित जमाती ८३७

प्रभागाची व्याप्ती : सेव्हन हिल्स रुग्णालय, मरोळ बस डेपो, कदमवाडी, मरोळ, विजयनगर

............................................................

प्रभाग क्रमांक ७६

एकूण लोकसंख्या ५४७०७

अनुसूचित जाती ४२३२

अनुसूचित जमाती ८६४

प्रभागाची व्याप्ती : देवल तलाव, सीप्झ, सुभाषनगर, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेट, महाकाली गुंफा

............................................................

प्रभाग क्रमांक ७७

एकूण लोकसंख्या ५३०४७

अनुसूचित जाती २२७२

अनुसूचित जमाती ४२५

प्रभागाची व्याप्ती : इन्कम टॅक्स कॉलनी, मेघवाडी, इंदिरानगर, कोकणनगर

............................................................

प्रभाग क्रमांक ७८

एकूण लोकसंख्या ५१४९९

अनुसूचित जाती ३४६

अनुसूचित जमाती २१३

प्रभागाची व्याप्ती : वांद्रे प्लॉट, झुला मैदान, शिवाजीनगर

............................................................

प्रभाग क्रमांक ७९

एकूण लोकसंख्या ५६६४२

अनुसूचित जाती ९६१

अनुसूचित जमाती ५६०

प्रभागाची व्याप्ती : शंकरवाडी, होली स्पिरिट रुग्णालय, तोलानी कॉलेज

............................................................

प्रभाग क्रमांक ८०

एकूण लोकसंख्या ५६१४८

अनुसूचित जाती १४५४

अनुसूचित जमाती ४७७

प्रभागाची व्याप्ती : एम.व्ही. कॉलेज, पारशी कॉलनी, आझादनगर, बिमानगर

............................................................

प्रभाग क्रमांक ८१

एकूण लोकसंख्या ४९३३४

अनुसूचित जाती २११३

अनुसूचित जमाती ६१९

प्रभागाची व्याप्ती : शेर-ए-पंजाब कॉलनी, गुंदवली, एमआयडीसी, मरोळ बस डेपो, हनुमान नगर

............................................................

प्रभाग क्रमांक ८२

एकूण लोकसंख्या ५१५३४

अनुसूचित जाती ३२१४

अनुसूचित जमाती ३८२

प्रभागाची व्याप्ती : जे.बी. नगर, अशोकनगर, रामलीला मैदान, साईनगर, ए.ए. कॉलनी

............................................................

प्रभाग क्रमांक ८३

एकूण लोकसंख्या ५४४१७

अनुसूचित जाती ५०६५

अनुसूचित जमाती ४१६

प्रभागाची व्याप्ती : आंबेडकरनगर, बामणवाडा, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, ए.ए. कॉलनी

............................................................

प्रभाग क्रमांक ८४

एकूण लोकसंख्या ५९७५५

अनुसूचित जाती ९५२

अनुसूचित जमाती ६०६

प्रभागाची व्याप्ती : कोलडोंगरी, तेजपाल स्कीम, परांजपे स्कीम, नेताजी सुभाषनगर

............................................................

प्रभाग क्रमांक ८५

एकूण लोकसंख्या ६०१२७

अनुसूचित जाती २५१४

अनुसूचित जमाती ३३२

प्रभागाची व्याप्ती : डहाणूकर कॉलेज, शास्त्रीनगर, विलेपार्ले पोलीस स्टेशन

............................................................

प्रभाग क्रमांक ८६

एकूण लोकसंख्या ५७७२४

अनुसूचित जाती २२०९

अनुसूचित जमाती ८३९

प्रभागाची व्याप्ती : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार व्हिलेज, चिमटपाडा

..................................................................................................

२०१२ साली के/ईस्ट वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवार

वॉर्डविजयी उमेदवार प्राप्त मतेपराभूत उमेदवार प्राप्त मते

६६उज्ज्वला मोडक, भाजपा८१५९राजेश हेगडे, काँग्रेस५१५१

६७मंजिरी परब, सेना १३२००मीना सलीन, मनसे ८८९६

६८अनंत नर, सेना १४२६७विलास मेहेतर, मनसे६९९६

६९शिवानी परब, सेना ११०००नम्रता परब, मनसे ६६१७

७०भालचंद्र अंबुरे, मनसे५०६७इनायत शेख, काँग्रेस३९८५

७१संध्या यादव, सेना ९१२३सुषमा देसाई, मनसे ८०६४

७२सुनीता इलवडेकर, सेना९२३४ज्योती बिर्जे, एनसीपी४५५१

७३केसरबेन पटेल, काँग्रेस१०८९१स्नेहलता वारेकर, मनसे३३५२

७४प्रमोद सांवत, सेना ९८४६सुधीर कावा, काँग्रेस ७७८५

७५सुषमा राय, काँग्रेस ६६१३प्रणाली वेदक, सेना ४९६९

७६स्मिता सावंत, सेना ९२७८जगदीश्वरी अमीन, काँग्रेस ८५३९

७७विनी डिसुझा, काँग्र्रेस५९३२रिद्धी धुरी, सेना ५७०७

७८मनीषा पांचाळ, सेना ८३०४सुनीता पारकर, मनसे६२८०

७९सुभाष पाटकर, सेना १०२४९वीणा भागवत, मनसे ८७२३

८०ज्योती अळवणी, अपक्ष८४७७सोनाली भाटवडेकर, मनसे ४६९३

..................................................................................................

Web Title: K / East Ward - Continued checking of eagles with the claimants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.