कैद्याची आत्महत्येला नैराश्याची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:23 AM2017-07-31T03:23:31+5:302017-07-31T03:23:38+5:30

ऐन तारुण्यात बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याचा प्रसंग आणि वर्षभरापासून जामीन मिळत नसल्याने, आलेल्या नैराश्यातून २२ वर्षीय कैद्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहात शनिवारी उशिरा रात्री गळफास घेतल्याची माहिती

kaaidayaacai-atamahatayaelaa-naairaasayaacai-kainaara | कैद्याची आत्महत्येला नैराश्याची किनार

कैद्याची आत्महत्येला नैराश्याची किनार

Next

ठाणे : ऐन तारुण्यात बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याचा प्रसंग आणि वर्षभरापासून जामीन मिळत नसल्याने, आलेल्या नैराश्यातून २२ वर्षीय कैद्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहात शनिवारी उशिरा रात्री गळफास घेतल्याची माहिती आता समोर येत आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील डोंगरीपाड्याचा रहिवासी आशिष बरनवाल याच्यासह सहा आरोपींविरुद्ध एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा, वसई तालुक्यातील वाळुंज पोलीस ठाण्यात दाखल होता.
१९ जुलै २०१६ रोजी आशिषला पोलिसांनी अटक केली,
तेव्हापासून तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात होता. या गुन्ह्यातील आशिषचे आणखी चार सहआरोपी याच कारागृहात होते.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी कारागृहातील कैद्यांना चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपट संपल्यानंतर रात्री उशिरा कारागृहातील एका कोपºयामध्ये असलेल्या शौचालयामध्ये आशिषने टीशर्टच्या सहाय्याने गळफास घेतला. कारागृहात सर्वत्र सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत, परंतु मानवाधिकारी आयोगाच्या नियमानुसार शौचालयांमध्ये सीसी कॅमेरे लावता येत नाही, असे तुरुंग अधीक्षक नितीन वायचाळ यांनी सांगितले.
आशिषला वडील नाहीत. आई आणि चुलतभाऊ त्याच्या जामिनासाठी वर्षभरापासून प्रयत्न करीत आहेत. जो गुन्हा आपण केलाच नाही, त्यासाठी शिक्षा भोगावी लागत असल्याची खंत त्याने अनेकदा सहआरोपींजवळ व्यक्त केल्याची माहिती आता समोर येत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोलही मिळत नाही. त्यामुळे वर्षभरापासून गजाआड असलेल्या आशिषचे मानसिक खच्चीकरण
झाले होते, असे त्याच्या सहआरोपींच्या प्राथमिक जबाबातून समोर येत आहे.
बलात्काराच्या या गुन्ह्यातील एका आरोपीला पीडित मुलीने ओळख परेडमध्ये ओळखले नव्हते. त्यामुळे त्याची सुटका झाली होती. उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आशिषच्या मृतदेहाचा पंचनामा न्यायदंडाधिकाºयांसमोर करण्यात आला. कारागृहातील सर्व सीसी कॅमेºयांचे फुटेज तपासणे आणि सहआरोपींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नितीन वायचाळ यांनी दिली. ठाणेनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: kaaidayaacai-atamahatayaelaa-naairaasayaacai-kainaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.