कारागृहामधील सूत्रधार गुंतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 03:56 AM2017-07-29T03:56:41+5:302017-07-29T03:56:44+5:30
भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात, कारागृह प्रशासनातील काही बड्या हस्ती गुंतल्या असल्याचा आरोप शिवसेना सदस्य नीलम गोºहे यांनी केला.
मुंबई : भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात, कारागृह प्रशासनातील काही बड्या हस्ती गुंतल्या असल्याचा आरोप शिवसेना सदस्य नीलम गोºहे यांनी केला. ज्या काठीने मंजुळाला मारहाण झाली, ती काठी सापडली नाही. काही पुरुष कैद्यांनी पुरावा नष्ट करत, त्यांनीच रक्ताचे डाग पुसले, असा आरोपही त्यांनी केला.
मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातील तपासातील दिरंगाई, महिला कैद्यांच्या दुरवस्थेच्या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी सदस्यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली. जन्मठेपेची शिक्षा भोगणाºया मंजुळा शेट्ये हिची लवकरच सुटका होणार होती, परंतु तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ती आतील आक्षेपार्ह गोष्टी बाहेर सांगेल, या भीतिपोटीच कट करून तिचा खून केला गेला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. मात्र, या प्रकरणाच्या तपास करणाºया स्वाती साठे यांनी आरोपी पोलिसांची बाजू घेतल्याचे उघड झाले आहे. आरोपी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यातही
विलंब करण्यात आला. त्यामुळे त्यांना ताबडतोब निलंबित करून, त्यांना सहआरोपी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्याची मान शरमेने खाली गेली आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत केली.