कदम यांच्या टायपिस्टने घेतले ५० हजार
By admin | Published: May 9, 2017 02:37 AM2017-05-09T02:37:23+5:302017-05-09T02:37:23+5:30
अमरावतीच्या वाळू ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपिस्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमरावतीच्या वाळू ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपिस्ट महेश सावंतला (४६) मलबार हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने यापूर्वी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारल्याचे उघड झाले आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते यांच्या मलबार येथील शासकीय निवासस्थानातून सावंतने अमरावतीच्या वाळू ठेकेदाराला कॉल केला. त्यानंतर कदमांच्या नावाचा वापर करत १० लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली होती. सावंतच्या सांगण्यावरुन या प्रकरणातील फरार आरोपीने तक्रारदाराकडून ५० हजार घेतल्याची माहिती तपासात समोर आली. सावंत उर्वरित रकमेसाठी सतावत असल्याने तक्रारदाराने कदम यांच्या पीएच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर कदम यांच्या आदेशाने मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.