कोकणातील चाकरमानी परतीच्या मार्गावर!
By admin | Published: September 5, 2014 02:18 AM2014-09-05T02:18:47+5:302014-09-05T02:18:47+5:30
कोकणातील आपल्या गावी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणोसह मुलंड, भांडूप परिसरातील सुमारे 33 हजार 7क्4 चाकरमानी त्यांच्या गावी गेले आहेत.
Next
ठाणो : कोकणातील आपल्या गावी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणोसह मुलंड, भांडूप परिसरातील सुमारे 33 हजार 7क्4 चाकरमानी त्यांच्या गावी गेले आहेत. सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून यातील बहुतांशी चाकरमानी आज परतीला निघाले असल्याचे ठाणो एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
त्यांना गावी सोडण्यासाठी ठाणो एसटी विभागाने सुमारे 766 बस कोकणात सोडल्या आहेत. एका बसमध्ये सुमारे 44 प्रवाशांची आसन व्यवस्था केलेली आहे. यानुसार 33 हजार 7क्4 चाकरमानी कोकणात गेले आहेत. ते आता परतीला निघाले असून त्यांच्यासाठी रायगड, र}ागिरी, सिंधुदुर्गमध्से बस तैनात केल्या आहेत.
या परतीच्या गणोशभक्तांना घेऊन या बस ठाणो येथील सीबीएस बस स्थानकासह मुलुंड, भांडूप, बोरिवली नॅन्सी, भाईंदर, कल्याण आणि विठ्ठलवाडी येथे येणार आहेत. ठाणो विभागाच्या 191 बस तर नाशिक, नगर, धुळे, औरंगाबाद या विभागांच्या सुमारे 55क् बस या प्रवाशांना घेऊन येत असल्याचे एसटीने स्पष्ट केले. प्रवाशांच्या या सेवेच्या दरम्यान चिपळूणजवळ बोरिवलीच्या एका बसला जाताना अपघात झालेला आहे. पण या अपघाताव्यतिरिक्त चाकरमान्यांना परिपूर्ण सेवा देण्यात यशस्वी ठरल्याचा दावा एसटीने केला आहे. (प्रतिनिधी)