केकाटलाच नाय डीजे.. जनतेची शपथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2016 10:51 PM2016-09-16T22:51:29+5:302016-09-16T23:45:15+5:30

डॉल्बी पुन्हा अडगळीतच : ‘लोकमत’ची मोहीम सातारकरांनी बनविली लोकचळवळ--आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

Kakat Nay DJ .. people's oath! | केकाटलाच नाय डीजे.. जनतेची शपथ !

केकाटलाच नाय डीजे.. जनतेची शपथ !

googlenewsNext

सातारा : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या डॉल्बीमुक्ती मोहिमेला प्रतिसाद देत सातारकरांनी यंदा डॉल्बी हद्दपार केली. झांजपथक, हलगी, ढोलपथक, कोकणी वाद्यांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, ही भूमिका घेऊन ‘लोकमत’ने गेल्या महिनाभरापासून ‘आव्वाज गावाचा न्याय डॉल्बीचा’ या आशयाखाली जनजागृती केली. त्याला जिल्ह्यातून आणि सातारा शहरातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. डॉल्बीसंदर्भात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत कठोर कारवाई करण्याचा निर्धार केला. त्यामुळे ही मोहीम खऱ्या अर्थाने फत्ते झाली.
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये दोन डॉल्बी व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यंदा डॉल्बी व्यावसायिक आणि गणेश मंडळांनी ‘लोकमत’च्या मोहिमेला प्रतिसाद देत डॉल्बी कोनाड्यात ठेवून देणे पसंत केले.
यंदा शंभर टक्के डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक पार पडल्याने अनेक नागरिकांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयात फोन करून ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.
ऐतिहासिक जिवंत देखाव्यांसह हलगी, नाशिक ढोल, झांजपथक, बँजो, डिजिटल बँजो, लेझीम पथक, दांडपट्टा असे पारंपरिक खेळ आणि वाद्य यंदा विसर्जन मिरवणुकीमध्ये सातारकरांना पाहावयास मिळाली. (प्रतिनिधी)


तब्बल सोळा तास मिरवणूक !
काही सार्वजनिक मंडळांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता विसर्जन मिरवणुकीस सुरुवात केली. रात्री बाराला पोलिसांनी पारंपरिक वाद्य वाजविण्यास अटकाव केल्यानंतरही काही मंडळांनी विसर्जन मिरवणूक सुरूच ठेवली होती. पहाटे तीन वाजता दोन सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जनस्थळी पोहोचली होती. मात्र, यावेळी क्रेन नादुरुस्त झाली. त्यामुळे बराचवेळ गणेशमंडळांना वाट पाहावी लागली. सकाळी आठ वाजता क्रेन दुरुस्त झाल्यानंतर दोन्ही मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.


विसर्जन मिरवणुकीत वादावादी
येथील कन्याशाळेसमोर दोन सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र आली. पुढे-मागे जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला. एकमेकांना मारहाण सुरू झाल्यानंतर गणेशभक्तांमध्ये धावाधाव सुरू झाली. सुमारे पाच मिनिटे ही वादावादी सुरू होती. त्यानंतर आपापसात तोडगा काढून ही मंडळे मार्गक्रम झाली. पोलिस येईपर्यंत हा वाद मिटला होता.


विसर्जन मिरवणुकीत वादावादी
येथील कन्याशाळेसमोर दोन सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र आली. पुढे-मागे जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला. एकमेकांना मारहाण सुरू झाल्यानंतर गणेशभक्तांमध्ये धावाधाव सुरू झाली. सुमारे पाच मिनिटे ही वादावादी सुरू होती. त्यानंतर आपापसात तोडगा काढून ही मंडळे मार्गक्रम झाली. पोलिस येईपर्यंत हा वाद मिटला होता.
सातारा : ‘डॉल्बी संस्कृतीने निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर आवाज उठविण्याचे धाडस केवळ ‘लोकमत’ने दाखविल्यानेच साताऱ्यातील गणेशोत्सव डॉल्बीमुक्त अनुभवाला मिळाला़
साताऱ्याच्या भूमीत अशक्य वाटणारी ही घटना केवळ ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच झाली,’ अशा भावना गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केल्या.
काटेकर यांनी पुढे म्हटले आहे, सामाजिकतेची जाणीव ठेवून अखंडपणे वाटचाल करणाऱ्या ‘लोकमत’ने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना दिशा दिली आहे. डॉल्बीमुक्तीचा संदेश देत साताऱ्याच्या ऐताहासिक भूमीत ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन, प्रबोधनात्मक कार्यातून चमत्कार घडविला.
आधुनिकतेच्या नावाखाली तरुणाईमध्ये वाढलेली चंगळवादी प्रवृत्तीने सार्वजनिक गणेशोत्सवाला गालबोट लागत होते़ तरुणाईमध्ये वाढलेल्या प्रवृत्तीवर प्रहार करताना सातत्याने प्रशासकीय यंत्रेणा व सातारकरांना सोबत घेऊन व्यापक चळवळ उभारली.
‘लोकमत’ने केलेल्या प्रबोधनामुळे डॉल्बीच्या दुष्परिणामाची माहिती समाजाच्या सर्वच स्तरापर्यंत पोहोचली. आणि पाहता-पाहता या चळवळीचे रूपांतर लोकचळवळीत झाले़ हा इतिहास ‘लोकमत टीम’ने रचला़ ’ असेही काटेकर यांनी सांगितले.


डॉल्बी लावण्यापूर्र्वीच यंत्रणा ताब्यात
विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील दोन मंडळांनी डॉल्बी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन दोन्ही डॉल्बी पोवई नाक्यावरून ताब्यात घेतल्या. विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई करून डॉल्बी त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या.

Web Title: Kakat Nay DJ .. people's oath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.