कल्याण : नगरसेवकांवर केवळ जमावबंदी उल्लंघनाचे गुन्हे ,महापौरांना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 04:02 AM2017-08-03T04:02:07+5:302017-08-03T04:02:11+5:30

केडीएमसीतील सत्ताधारी नगरसेवकांनी घातलेल्या धिंगाण्याप्रकरणी प्रशासनाच्या तक्रारीवरून केवळ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाला.

Kalyan: The corporators are excluded from the gangrape violation, Mayor | कल्याण : नगरसेवकांवर केवळ जमावबंदी उल्लंघनाचे गुन्हे ,महापौरांना वगळले

कल्याण : नगरसेवकांवर केवळ जमावबंदी उल्लंघनाचे गुन्हे ,महापौरांना वगळले

Next

कल्याण : केडीएमसीतील सत्ताधारी नगरसेवकांनी घातलेल्या धिंगाण्याप्रकरणी प्रशासनाच्या तक्रारीवरून केवळ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाला. आयुक्त कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड होऊनही सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्याला बगल देण्यात आली आहे. ‘गोंधळी’ नगरसेवक सत्ताधारी असल्याने प्रशासनानेही सावध अशी ‘बोटचेपी’ भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे.
नगरसेवकपदी निवडून येऊन दोन वर्षे उलटूनही विकासकामांच्या फायली मंजूर होत नसल्याची ओरड करत केडीएमसीतील सत्ताधाºयांनी मंगळवारी आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधात आंदोलन केले. यात नगरसेविकांची भूमिका महत्त्वाची होती. यात महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेते रमेश जाधव, सभागृह नेते राजेश मोरे आणि स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे हे पदाधिकारीही सहभागी झाले होते. याप्रकरणी केडीएमसीचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांच्या तक्रारीवरून नगरसेविका छाया वाघमारे, रजनी मिरकुटे, वैजयंती गुजर-घोलप, मनीषा तारे, नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, वीणा जाधव, गुलाब म्हात्रे, पूजा म्हात्रे, लाजवंती मढवी, सुशीला माळी, संगीता गायकवाड, प्रेमा म्हात्रे, आशालता बाबर, शकिला खान यांच्यासह सभापती रमेश म्हात्रे, गटनेते रमेश जाधव, सभागृह नेते राजेश मोरे, प्रकाश पेणकर, मोहन उगले, श्रेयस समेळ, दशरथ घाडीगावकर, गणेश कोट, सुधीर बासरे अशा २५ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आला.
बेकायदा जमाव जमवणे, आंदोलन छेडण्यापूर्वी प्रशासनाला कोणतीही माहिती न देता तसेच परवानगी न घेणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. पण, सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल झालेला नाही.
विशेष म्हणजे, या आंदोलनात महापौर देवळेकरदेखील सहभागी होते. जी नगरसेवकांची भावना आहे, ती माझीही असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. परंतु, गुन्हा दाखल करताना त्यांना ‘अभय’ देण्यात आले. हा सर्व प्रकार अतिरिक्त आयुक्त संजय घरत, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, जलअभियंता चंद्रकांत कोलते, लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण, लघुलेखक यमगर, उपायुक्त नितीन नार्वेक र यांच्या समक्ष घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे या संबंधितांना साक्षीदार म्हणून भूमिका बजावावी लागणार आहे.
नगरसेवकांना नोटीस बजावून पुढील कारवाई
गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवक तसेच पदाधिकाºयांना तत्काळ अटक होणार नाही. त्यांना प्रथम नोटीस बजावली जाईल आणि त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यानुसार, पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
नगरसेवकांनी जमावबंदीचा आदेश मोडला आहे, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनानंतर आयुक्तांनी स्वत: नगरसेवकांशी चर्चा केली. त्या वेळी कोणताही गोंधळ झाला नाही, त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
दुजाभाव का करता?
आम्ही नागरिकांच्या समस्यांवर साधी आयुक्तांची भेट मागितली असता त्यांनी दिली नव्हती. अखेर, दालनात घुसखोरी केली असता आमच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे याआधी दाखल झाले आहेत.
मग, सत्ताधाºयांना वेगळा न्याय का? प्रशासन त्यांना घाबरते का, असे सवाल मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी उपस्थित केले आहेत. शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीतून महिलांना पुढे करून जो पुरुषार्थ दाखवण्यात आला आहे, तोही लांच्छनास्पद असल्याचे कदम म्हणाले.
जसे घडले तशी तक्रार दिली : सकाळी आंदोलनाची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल व्हायला रात्र उजाडली. त्यातही किरकोळ गुन्हे दाखल करून सत्ताधाºयांच्या बाबतीत सावध भूमिका घेतल्याचे प्रशासनाने दाखवून दिले आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करणारे सुरक्षा अधिकारी खेर यांच्याशी संपर्क साधला असता जे घडले, त्यानुसार तक्रार दिल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
घटनास्थळी नसतानाही गुन्हा
शिवसेनेच्या नगरसेवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात नगरसेविका पूजा म्हात्रे यांचेही नाव आहे. परंतु, त्या घटनास्थळी नव्हत्या. तरीही त्यांचे नाव या प्रकरणात गोवल्याचा आरोप पूजा यांचे पती योगेश यांनी केला आहे.
योगेश यांनी यासंदर्भात बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधला असता चौकशी करून त्यांचे नाव काढण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Kalyan: The corporators are excluded from the gangrape violation, Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.