कल्याण-डोंबिवलीत बाप्पाला भावपूर्ण निरोप; दुपारपासून विसर्जनाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 06:44 PM2017-09-05T18:44:08+5:302017-09-05T18:44:47+5:30
कल्याण डोंबिवली शहरातही गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो आहे.
कल्याण,दि.5- कल्याण डोंबिवली शहरातही गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो आहे. कल्याणमधील दुर्गाडी गणेश घाटासह अन्य ठिकाणच्या विसर्जन स्थळांवर दुपारपासूनच घरगुतीसह सार्वजनिक मंडळाच्या गणपतींना ढोल ताशांच्या गजरात निरोप दिला जातो आहे. कल्याण डोंबिवली शहरात १६ ठिकाणी कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तर सुरक्षेच्या कारणास्तव १३ मोठ्या विसर्जन स्थळावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये काही वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे
. डोंबिवलीत मात्र वाहतूक मार्गात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. येथील मोठा गाव ठाकुर्ली, जूनी डोंबिवली गणेशघाटांसह, चोळेगांव, खंबाळपाडा तलावात गणेशमुर्तींचे विसर्जन केले जात आहे. विसर्जन स्थळांसह महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.