कल्याण गौरीपाड्यात दहा वेळा बत्ती गुल

By admin | Published: July 19, 2016 03:19 AM2016-07-19T03:19:50+5:302016-07-19T03:19:50+5:30

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात वीजपुरवठा सासत्याने खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Kalyan gauripada ten times the light bulb | कल्याण गौरीपाड्यात दहा वेळा बत्ती गुल

कल्याण गौरीपाड्यात दहा वेळा बत्ती गुल

Next


चिकणघर : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात वीजपुरवठा सासत्याने खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत २४ तासांत किमान दहा वेळा पुरवठा खंडित होत असल्याने त्रासातच भर पडली आहे.
गेल्या दोन तीन महिन्यांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आधी उन्हाळ््याची कामे सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र सध्या कोणतेही कारण न देता पुरवठा खंडित होतो आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
बारावे महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मे महिन्यापासून विजेचा दाब कमी-जास्त होण्याचे प्रमाण वाढल्याने विद्युत उपकरणे निकामी होत असल्याच्या तक्र ारीही नागरिकांनी केल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी वाहिन्यांखालील वृक्षांची छाटणी झाली नसल्याचे आणि रोहित्रातील आॅईलची लेव्हल राखण्यात दुर्लक्ष झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. विजेचा दाब १२० ते १५० व्होल्टपर्यंत खाली आल्यामुळे फ्रिड, टीव्ही, एसी ही उपकरणे चालत नाहीत. लाईट डीम झाल्याने रात्री अनेकदा ट्यूबही लागत नाहीत. हा त्रास रात्री खूप जाणवतो. याबाबत बारावे महावितरणचे अभियंता पाटील यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)

Web Title: Kalyan gauripada ten times the light bulb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.