कल्याण-नाशिक लोकल तांत्रिक कारणास्तव लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:28 AM2019-02-07T06:28:35+5:302019-02-07T06:29:20+5:30

कल्याण-नाशिक मार्गावर चालवण्यासाठी जादा क्षमतेच्या लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र घाटातील प्रवासाच्या दृष्टीने या गाड्यांचे ‘सॉफ्टवेअर अपग्रेडशन’ करण्यास काही काळ लागणार आहे.

Kalyan-Nashik local for long term due to technical reasons | कल्याण-नाशिक लोकल तांत्रिक कारणास्तव लांबणीवर

कल्याण-नाशिक लोकल तांत्रिक कारणास्तव लांबणीवर

googlenewsNext

मुंबई  - कल्याण-नाशिक मार्गावर चालवण्यासाठी जादा क्षमतेच्या लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र घाटातील प्रवासाच्या दृष्टीने या गाड्यांचे ‘सॉफ्टवेअर अपग्रेडशन’ करण्यास काही काळ लागणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी ही लोकल सेवा लांबणीवर पडली आहे.

कारशेडमध्ये गाडीची सर्व तांत्रिक सुसज्जता झाल्यानंतर या लोकलची चाचणी घेण्यात येईल. कसारा घाटात या लोकलची खरी परीक्षा आहे. त्यासाठीच सर्व तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे. सुखरूप प्रवासाची खात्री झाल्यावरच ही चाचणी होईल. त्यात रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मान्यता मिळेल. मगच लोकल सेवा सुरू करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. लोकलच्या चाचणीसाठीच दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बºयाच कालावधीपासून कल्याण-नाशिक लोकलची चर्चा सुरू आहे. मात्र कल्याण-नाशिक लोकलने प्रवास करण्याची प्रवाशांची इच्छा पूर्ण होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. अद्याप लोकलच्या चाचण्या सुरू
झाल्या नाहीत.

या लोकलमध्ये अत्यावश्यक ब्रेक सिस्टीम, उच्च दाब शक्ती, इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स ट्रेनसह ३२ चाकांना पार्किंग ब्रेकची सुविधा देण्यात आली आहे. या नव्या लोकलची ताशी शंभर किमी वेगाने धावण्याची क्षमता आहे.

चाचणीनंतर पुढील निर्णय
रेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकल चाचणीसाठीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून विशेष लोकल तयार करून आणली आहे. ही लोकल विशेषत: घाटावर चालण्यासाठी योग्य असते. सर्व तांत्रिक बाबी पडताळण्यात येणार असून रेल्वे सुरक्षा विभागाची मंजुरी घेऊन लोकलची चाचणी केली जाणार आहे. या लोकलची चाचणी झाल्यावरच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

Web Title: Kalyan-Nashik local for long term due to technical reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.