कल्याणची जागा ही मुळची भाजपचीच, श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंनी फाजील लाड केले - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 12:23 PM2023-06-10T12:23:10+5:302023-06-10T12:23:42+5:30
कल्याणमधील अशा घटना घडामोडींकडे फार गांभीर्याने पाहत नाही हे होणारच होते आणि होणार आहे. 25 वर्षात भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळा प्रत्येक निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळेला हीच भूमिका ठेवली होती.
शिवसेनेसारखा पक्ष फोडणे आणि शिवसेना पक्ष फोडून महाराष्ट्र कमजोर करणे, मुंबईवर शिवसेनेची पर्यायाने मराठी माणसाची पकड ढिली करणे हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे एक टास्क आहे. ते करायचे असेल तर आधी शिवसेना फोडावी लागेल. एकनाथ शिंदेंसह पाच-सहा लोकांचा प्रयत्न तसा गेल्या काही काळापासून सुरू होता. पण त्यांची ताकद पाच ते सहा आमदारांच्या पुढे नसावी. त्याच्यामुळे जे चित्र नंतर निर्माण झालं ते चित्र निर्माण करण्यात भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व गृह मंत्रालय, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून केलेला दबाव याच्यामुळे हा पक्ष फोडण्यात आला असा आरोप शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
इतक्या मोठ्या संख्येने जे आमदार गेलेत त्यातील बारा एक आमदारांवर खटले चालू होते. अनेक खासदारांवरती अनेक प्रकारचे खटले सुरू होते. या सगळ्यांचा वापर करून अमित शहा यांच्या माध्यमातून पक्ष फोडण्यात आला. महाराष्ट्राचे उद्योग बाहेर जायला लागले. महाराष्ट्राचा आवाज कमजोर व्हायला लागला हे सगळं गेल्या वर्षभरात झाले. एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा ईडीच्या माध्यमातूनच दबाव आला. आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की त्यांच्यासमोर ते कसे रडले हे मलाही माहित आहे. आम्ही अनेकदा चर्चा केल्यात. आमचं म्हणणं होतं की, आपण खंबीर राहिलं पाहिजे. आपलं मन खंबीर ठेवलं पाहिजे. हेही दिवस निघून जातील घाबरून चालणार नाही. पण हे लोक घाबरले आता मोठा आणत आहेत गर्जना करतायत. पण, त्या पोकळ गर्जना आहेत. भविष्यात भारतीय जनता पक्ष यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि ती सुरुवात झालेली आहे, असे राऊत म्हणाले.
आम्ही कशाला वचन निभावले नाही. वचन त्यांनी निभावले नाही. 2014 साली त्यांनी युती तोडली. आम्ही नाही तोडली हे स्वतः एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. एकनाथ खडसे त्या पक्षात होते. कल्याणमधील अशा घटना घडामोडींकडे फार गांभीर्याने पाहत नाही हे होणारच होते आणि होणार आहे. 25 वर्षात भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळा प्रत्येक निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळेला हीच भूमिका ठेवली होती. जागा वाटपात जागा कशा कशी कमी करता येईल आणि वाटप झाल्यानंतर त्यांचे उमेदवार कसे पाडता येतील, हेच भाजपाने पाहिले असे राऊत म्हणाले.
आता हा जो गट त्यांच्याकडे गेलेला आहे त्यांना भोगू द्या. कल्याणची जागा ही भारतीय जनता पक्षाकडे त्या काळात होती. शिवसेनेने कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा गड असल्यामुळे ती जागा आमच्याकडे मागून घेतली. तेव्हा आनंद दिघे होते आणि ती जागा आम्ही सातत्याने जिंकत आलो आणि ती जागा शिवसेनेचा कोणताही संबंध नसताना पक्षकार्याची कोणताही संबंध नसताना श्रीकांत शिंदे यांना देण्यात आली. त्यासाठी गोपाल लांडगे यांना दिलेली उमेदवारी मागे घेण्यात आली. उद्धव ठाकरेंनी तेव्हा लाड केले होते, शिंदे पुत्राचे हे फाजील लाड होते. आता त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या, प्रत्येक जागेसाठी भारतीय जनता पक्ष रडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.