बाल नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी कांचन सोनटक्के

By admin | Published: August 19, 2015 12:48 AM2015-08-19T00:48:45+5:302015-08-19T00:48:45+5:30

नाट्यशाला या संस्थेच्या माध्यमातून अंध, अपंग, कर्णबधिर आणि गतिमंद मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना रंगभूमीवर आणणाऱ्या

Kanchan Sontakke as president of Bal Natya Sammelan | बाल नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी कांचन सोनटक्के

बाल नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी कांचन सोनटक्के

Next

सोलापूर : नाट्यशाला या संस्थेच्या माध्यमातून अंध, अपंग, कर्णबधिर आणि गतिमंद मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना रंगभूमीवर आणणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी कांचन कमलाकर सोनटक्के यांची होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय मराठी बाल नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. २७,२८,२९ नोव्हेंबर रोजी येथील हरिभाई देवकरण प्रशालेत हे संमेलन होत आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष, अभिनेते मोहन जोशी यांनी दुपारी पत्र परिषदेत ही घोषणा केली. संमेलनाचे अध्यक्षपद मानाचे असल्यामुळे यासाठी निवडणूक व्हायला नको, या भूमिकेतून सोनटक्के यांची निवड केल्याचे जोशी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Kanchan Sontakke as president of Bal Natya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.