कन्नडीगांना बेळगावमध्येच रोखले
By admin | Published: August 3, 2014 01:27 AM2014-08-03T01:27:06+5:302014-08-03T01:27:06+5:30
महाराष्ट्र राज्य फलक हटविल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी येळ्ळूरमध्ये जाणा:या कन्नड रक्षण वेदिकेच्या शेकडो कार्यकत्र्याना पोलिसांनी बेळगावमध्येच रोखले.
Next
बेळगाव : महाराष्ट्र राज्य फलक हटविल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी येळ्ळूरमध्ये जाणा:या कन्नड रक्षण वेदिकेच्या शेकडो कार्यकत्र्याना पोलिसांनी बेळगावमध्येच रोखले. मागील आठवडय़ापासून येळ्ळूरमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण पोलिसांनी येळ्ळूरकडे जाणारे सारे रस्ते रोखले असल्यामुळे संघर्ष टळला. कन्नड रक्षण वेदिकेचा राज्य अध्यक्ष नारायण गौडा याला हुबळीत पोलिसांनी ताब्यात घेऊन माघारी पाठवून दिले.
दरम्यान, ‘वेदिके’च्या कार्यकत्र्यानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनांमुळे बेळगावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, बेळगावकडे येणाचा प्रयत्न करणा:या 75क् हून कार्यकत्र्याना पोलिसांनी अटक केल्याची माहिती उत्तर विभागाचे आयजीपी भास्कर राव यांनी दिली. या सा:यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळत असून, जनजीवनही विस्कळीत झाले आहे. (प्रतिनिधी)
चोख पोलीस बंदोबस्त
या घटनेनंतर महापालिका आणि सर्व सरकारी कार्यालयांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मोडतोड करण्याचा प्रयत्न करणा:या वेदिकेच्या कार्यकत्र्याना पोलिसांनी ताब्यात घेतले. महांतेशनगर येथे हुल्लडबाजी करणा:या वेदिकेच्या कार्यकत्र्याना पोलिसांनी अटक केली. शहरात येणा:या वाहनांची पोलीस तपासणी करीत आहेत.
सभा,बैठका घेण्यास बंदी
येळ्ळूरसह बेळगाव तालुक्यात महाराष्ट्र राज्यावरून सभा आणि बैठका घेण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.
मराठी वृत्तपत्रंवर कारवाई
बेळगावातील काही मराठी वृत्तपत्रंनी जिल्हा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची बदनामी केल्याचा ठपका ठेऊन, मराठी जनतेला भडकावणा:या वृत्तपत्रंवर कठोर कारवाई करण्याचा इशारा भास्कर राव यांनी दिला.
येळ्ळूर आणि बेळगाव शहर परिसरातील वातावरण पूर्वपदावर येत असताना कोणत्याही पक्षाचे तसेच संघटनेचे नेते येऊन जर शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांच्यावर कोणताही मुलाहिजा न राखता कठोर कारवाई केली जाईल़ बेळगावकडे येण्याचा प्रयत्न करणा:या 75क् हून अधिक व्यक्तींना अनेक ठिकाणी पोलिसांनी अटक केली आह़े - भास्कर राव, आयजीपी , बेळगाव