महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली- कन्हैया कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:45 AM2018-08-21T02:45:26+5:302018-08-21T02:45:58+5:30
पोलीस बंदोबस्त असताना उमर खालिदवर गोळ्या चालविण्याची हिंमत झालीच कशी, असा प्रश्न कन्हैयाने केला आहे.
नाशिक : कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकºयांपर्यंत तपासाचे धागेदोरे पोहोचल्याचा दावा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केला आहे. तसेच महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा आरोपही त्याने पत्रपरिषदेत केला.
देशात लोकशाही व तर्कशुद्ध विचार मांडणाºयांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. जाहीररीत्या कोणी भूमिका मांडत असल्यास त्यांच्यावर हल्ले होतात किंवा हत्या केली जाते. सरकार तपास यंत्रणा, माध्यमे तसेच न्याययंत्रणांना कमकुवत करीत असल्याचे सांगत न्यायमूर्ती लोया प्रकरणातही याचाच प्रत्यय आला. पोलीस बंदोबस्त असताना उमर खालिदवर गोळ्या चालविण्याची हिंमत झालीच कशी, असा प्रश्न कन्हैयाने केला आहे.
संयोजकांना धमक्या
मोबाइलवर दोन वेळा परजिल्ह्यातून फोन करून धमकी दिल्याचा दावा व्याख्यानमालेचे आयोजक सचिन मालेगावकर यांनी केला असून, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी मात्र तक्रार आली नसल्याचे सांगितले आहे़ प्रवेशद्वारावर
वरुण चव्हाण या व्यक्तीसोबत दोन फ्रेंच युवक आले. पोलिसांनी रोखून चौकशी केली़ तेव्हा चव्हाण यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी दोन्ही परदेशी युवकांकडील पासपोर्ट व व्हिसाची तपासणी केली असता ते पर्यटक असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना सभागृहाच्या
बाहेर काढले़