कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:58 IST2024-11-23T09:41:36+5:302024-11-23T09:58:31+5:30

Kankavli, Kudal, Sawantwadi Vidhan Sabha Election Result 2024 Live :

Kankavli, Kudal, Sawantwadi vidhan sabha assembly election result 202 Konkan one of the nitesh Rane leads, Nilesh Narayan rane lags behind; Who is Sindhudurg inclined towards? | कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....

कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....

Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live : विधानसभा निवडणुकीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचा कल हाती आले आहेत. यामध्ये दोन राणे बंधुंपैकी एक आघाडीवर असून एक पिछाडीवर आहे. तर सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाचे दिपक केसरकर आघाडीवर आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स

कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे 1048 मतांनी आघाडीवर आहेत. तर कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे हे पिछाडीवर गेले आहेत. ठाकरे गटाचे वैभव नाईक हे आघाडीवर आहेत. नाईक यांना दुसऱ्या फेरीत 3728 तर निलेश राणे यांना 3381 मते मिळाली आहेत.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेना दिपक केसरकर यांना 3639 मते मिळाली आहेत. तर ठाकरेंच्या राजन तेली यांना 1703 मते, भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांना 1536 मते मिळाली आहेत. केसरकर यांना 4487 चे मताधिक्य मिळाले आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क २० नोव्हेंबरला बजावला होता. मतदानाची टक्केवारी ६६.०५ इतकी होती. १५८ लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष असे मिळून ४ हजार १३६ उमदेवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. 

Web Title: Kankavli, Kudal, Sawantwadi vidhan sabha assembly election result 202 Konkan one of the nitesh Rane leads, Nilesh Narayan rane lags behind; Who is Sindhudurg inclined towards?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.