कन्नड संघटनांची दडपशाही, एकीकरण समितीच्या 22 कार्यकर्त्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2016 12:11 PM2016-11-04T12:11:31+5:302016-11-04T12:11:31+5:30
कन्नड संघटनांची दडपशाही अद्यापही सुरुच असून त्यांच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणखी 22 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बेळगाव, दि. 4 - कन्नड संघटनांची दडपशाही अद्यापही सुरुच असून त्यांच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणखी 22 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री कारवाई करत ही अटक केली आहे. याअगोदर पोलिसांनी एकीकरण समितीच्या सहा कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर दोन पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या सहा कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने वकील सुधीर चव्हाण, महेश बिर्जे,अमर येळ्ळूरकर,शाम पाटील यांच्यासह अन्य वकिलांनी न्यायालयात बाजू मांडून जामीन अर्ज दाखल केला. पाच कार्यकर्त्यांची उद्या सुटका होणार असून रत्नप्रसाद पवार यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.