शाळेच्या पहिल्या दिवशी ‘कन्या प्रवेशोत्सव’!

By admin | Published: June 12, 2016 04:27 AM2016-06-12T04:27:21+5:302016-06-12T04:27:21+5:30

मुलींच्या शाळेतील प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच १०० टक्के मुले-मुली पटावर आणण्यासाठी १५ जून २०१६ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी ‘कन्या प्रवेशोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात

'Kanya Ventee Festival' on the first day of school! | शाळेच्या पहिल्या दिवशी ‘कन्या प्रवेशोत्सव’!

शाळेच्या पहिल्या दिवशी ‘कन्या प्रवेशोत्सव’!

Next

मुंबई : मुलींच्या शाळेतील प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच १०० टक्के मुले-मुली पटावर आणण्यासाठी १५ जून २०१६ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी ‘कन्या प्रवेशोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशाताई लांडगे, इतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याकरिता हातभार लावावा. तसेच आपल्या भागातील मुलींना स्वत: शाळेत घेऊन जावे व प्रवेश करावा, असेही रहाटकर यांनी या वेळी सांगितले.
या कार्यक्रमांतर्गत शक्य झाल्यास मुलीस शालोपयोगी साहित्य देऊन त्यांचे शाळेत स्वागत करावे, असे रहाटकर यांनी या वेळी सांगितले. नंदुरबार, गडचिरोली, परभणी, नांदेड, हिंगोली या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी असून तेथे मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Kanya Ventee Festival' on the first day of school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.