कोकणातील सर्व ग्रामपंचायतींसह सरकारी शाळांना वायफाय सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:34 AM2017-07-29T04:34:41+5:302017-07-29T04:34:47+5:30
कोकणातील सर्व ग्रामपंचायतींसह सरकारी शाळांना वायफाय सुविधा देण्यात येणार असल्याने भविष्यात कोकण खºया अर्थाने डिजिटल होणार आहे.
अलिबाग : कोकणातील सर्व ग्रामपंचायतींसह सरकारी शाळांना वायफाय सुविधा देण्यात येणार असल्याने भविष्यात कोकण खºया अर्थाने डिजिटल होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये रायगड जिल्ह्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आज अलिबाग येथे दिली. अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात केंद्रांच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गीते बोलत होते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायती आणि सरकारी शाळांना वायफाय सुविधा पुरवणार आहे.
अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदर येथे सुरू करण्यात येणाºया रो-रो सेवेचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या सहा महिन्यांत सेवेला सुरु वात करण्यात येणार आहे. सागरमाला योजनेंतर्गत धरमतर खाडी, कुंडलिका नदी, रेवदंडा आणि मुरु ड येथे वॉटर वेज निर्माण करण्याच्या प्रकल्पांनाही लवकरच सुरु वात होणार आहे. याबाबतचे प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे पर्यटन उद्योगांना चालना मिळणार आहे.